ताज्या घडामोडी

बुध्दपोर्णिमा निमित्त मानवत येथे शांतीचा संदेश देत भव्य धम्मरॅली

भारतीय बौध्द महासभेच्या वतीने मानवत शहरात बुध्द जयंती मोठ्या ऊत्साहात साजरी

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथे भारतीय बौद्ध महासभा मानवत तालुका शाखेच्या वतीने बौध्द पौर्णिमे निमित्त *तथागत भगवान गौतम बुद्ध* यांच्या प्रतिमेची मानवत शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील आंबेडकर नगर येथील भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पन करून संपूर्ण मानवत शहरातील मेन रोड वरून भव्य रॅली काढण्यात आली. तर बौध्द पोर्णिमे निमित्त काढण्यात आलेल्या भव्य रॅलीचा समारोप मानवत शहरातील राजर्षी शाहू नगरा मधिल नालंदा बौद्ध विहार येथे समारोप करण्यात आला.
यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून यावेळी उपस्थित जनसमुदाय यांना वंचित बहुजन आघाडीचे नेते मा. धम्मपालजी सोनटक्के, मानवत तालूका भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष मा. बालकिशन धबडगे , मानवत तालुका सरचिटणीस रामेश्वरजी एडके, मानवत तालुका उपाध्यक्ष उपसंत कांबळे यांनी यावेळी उपस्थित जन समूदाय व समाज बांधवांना मार्गदर्शन केले. तर यावेळी श्रामणेर संघाचे संघनायक भन्ते आनंद यांच्या धम्मदेशनाने व शरणातय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाला मानवत तालुक्यातील हाजारो बौध्द उपासक महिला , व पुरुष या वेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानवत तालुका कोषाध्यक्ष शिवाजीराव लाटे मानवत तालुका संघटक दतरावजी तूपसमुद्रे व बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांच्यासह महिला पुरुष यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.