ताज्या घडामोडी

शहरातील व्यापार्‍यांच्या* *समस्याचे निराकरण करणार- संदीप बोरकर ( पोलिस उपनिरीक्षक

मानवत / प्रतिनिधी.

मानवत पोलिस स्टेशन मध्ये शहरातील व्यापारी असोसिएशनच्या व्यापारी बांधवांच्या बैठकीचे आयोजन दिनांक 31 मे 2024 रोजी संध्याकाळी सहा वाजता मानवत पोलिस स्टेशन मध्ये करण्यात आले होते.
यावेळी घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठकीला मानवत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे पाटील, सुरेशसेठ काबरा, कृष्णासा बाकळे, कपिलसेठ उदावंत, अॅड गणेश मोरे पाटील , दिलीपसेठ हिबारे, निशांतसा दगडू , संदीपसेठ भाकरे, गंगाधरजी संगवे, भाजपाचे सतीषसेठ हापसनकर , लक्ष्मीनारायणजी चांडक, स्वप्निलसेठ शिंदे पाटील, संजयसेठ शहाणे , अमोल दादा गायके, दशरथजी शिंदे पाटील यांच्यासह शहरातील व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने यावेळी महत्वपूर्ण बैठकीला उपस्थित होता. यावेळी घेण्यात आलेल्या व्यापारी असोसिएशनच्या बैठकीचे अध्यक्ष म्हणून मानवत पोलिस स्टेशनचे नूतन पोलिस उपनिरिक्षक संदीप बोरकर हे होते शहरातील व्यापारी वर्गाच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी व त्यावर उपाय करण्यासाठी मानवत व्यापारी असोसिएशनच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये व्यापाराच्या समस्या जाणून घेण्यात आल्या व त्या त्या कशा पद्धतीने सोडविता येतील यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या महत्वपूर्ण बैठकीत दिलीपसेठ हिबारे, सुरेशसेठ काबरा यांनी शहराच्या बाहेर असलेल्या के. के. एम. महाविद्यालय रोड तसेच राष्ट्रिय महामार्गावर असलेल्या उड्डाण पुलाखालील ब्लॅक स्पोटसाठी चिडीमार पथक स्थापन करण्याची मागणी केली. यावेळी मानवत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे पाटील यांनी मानवत येथील बंद पडलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेरे याकडे लक्ष वेधले व त्याचे निराकरण कशाप्रकारे करता येईल या विषया वर चर्चा करण्यात आली. यावेळी संदीप बोरकर यांनी बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे या विषयी चिंता व्यक्त केली. भविष्यात धोक्याची घंटा होऊ शकते काही दिवसापूर्वी मानवत शहरातील मोंढात घडलेल्या घटनेनंतर येथे सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे पुढील घटनांना पायबंध घालता आला आहे. या नंतर मानवत व्यापारी असोसिएशनच्या वतीने मानवत येथे नवीन रुजू झालेले संदीप बोरकर पोलीस उपनिरीक्षक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवीन पदोन्नती मिळालेले श्री, घोरपडे यांचा ही यावेळी व्यापारी असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.