ताज्या घडामोडी

समाज माध्यमावर भावना भडकविणार्‍या पोस्ट शेअर करू नका ; सामाजीक सलोखा राखून पोलिस प्रशासनास सहकार्य करा सपोनि, संदीप बोरकर.*

पोलीस ठाणे मानवत तर्फे जाहीर आवाह

मानवत / प्रतिनिधी.

पोलीस ठाणे मानवत जिल्हा परभणी हद्दीतील सुजाण नागरिकांना याद्वारे जाहीर आवाहन करण्यात येते की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 10/03/2024 पासून ते दिनांक 06/06/2024 रोजी पर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात असून परभणी जिल्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निकाल दिनांक 04/06/2024 रोजी जाहीर होणार आहे.
त्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडिया जसे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या,जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, चित्र,स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करणार नाही. कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे वाजवणार नाहीत, फटाके फोडणार नाहीत. तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये. व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक 03/06/2024 ते दिनांक 06/06/2024 या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये only admin करून बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाहीत जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिन ला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. असे आवाहन मानवत पो. स्टेचे सपोनि संदीप बोरकर यांनी केले.

*

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.