ताज्या घडामोडी

मानवतला मुलगी बघायला आले अनं लग्न करून गेले

मानवत येथे अगदी साध्या पद्धतीने विवाह संपन्न दूल्हेराजावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव*

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील वधू व गंगाखेड येथील वर यादोन्ही पक्षाच्या मंडळींनी मानवत शहरात वधू पित्याच्या घरी मुलगी बघण्यासाठी आले अण
साध्या पध्दतीने विवाह करून समाजा पुढे एक चांगला सामाजीक संदेश दिला आहे.
मानवत शहरातील खडकपुरा येथील रहिवासी महोम्मद वाजेद महोम्मद सलिम (जामाळी) बागवान यांची कन्या बघण्यासाठी आले अन मुलगी पसंद आल्यानंतर त्यांचा शुभविवाह
दि २८ मे रोजी मानवत येथील कुरेशी मज्जित येथे संपन्न झाला. यावेळी धर्मगुरू हाजी हाफेज यांनी *खुदबा* दिला व धर्मगुरू मौलाना सुलतान मिल्ली यांनी *दुवा पठण* केली.
गंगाखेड येथील अब्दुल वहाब बागवान यांचे पुत्र अब्दुल रज्जाक बागवान यांच्याशी मोजक्या लोकांच्या उपस्थिती मध्ये विवाह आयोजित करण्यात आला होता.
विवाह साध्या पद्धतीने करावे त्याच प्रमाणे कमी वेळेत कमी खर्चात करावे , इस्लाम धर्मातील प्रेशित मोहम्मद स. यांच्या शिकवणीस अनुसरून यावेळी हा आदर्श विवाह साध्या पद्धतीने केल्याने समाजात नवीन आदर्श निर्माण केला आहे. साध्या पद्धतीने झालेल्या या आदर्श विवाहामुळे वर-वधू कुटुंबाचे समाजात कौतुक होत आहे. या विवाह सोहळ्या मध्ये वर-वधूंना आशीर्वाद देण्यासाठी मानवत येथील बागवान पंच कमिटीचे सचिव एम.ए.रिजवान बागवान, कमिटीचे उपाध्यक्ष जिया-उल्ल- रहेमान, धर्मगुरू हाफेज खालेक, मोहम्मद रफीक नबी साब,अब्दुल कादर, अब्दुल रऊफ राणी सावरगाव, मोहम्मद फारुख, मुसविर सेठ, जाकीर हुसेन,हाजी रफिक बागवान, इलियास शेठ सेफवाले, हाजी नूरभाई कुरेशी, निसार बागवान, अकबर बागवान, फारुख भैय्या बागवान, ईरफान बागवान यांच्यासह बागवान समाज बांधव व परिसरातील नागरिक या विवाह सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.