ताज्या घडामोडी

यशाची परंपरा कायम ; नेताजी सुभाष विद्यालयात गूणवंताचा गूण गौरव , सत्कार समारंभ संपन्न.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गूण गौरव करून सत्कार करण्यात आला.
येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा सन २०२४ इयत्ता बारावी ( H.S.C.) बोर्डा 2024 चा निकाल 82.80% तर इयत्ता दहावी (S.S.C.) बोर्ड 2024 चा निकाल 84.10 एवढा लागला असून विद्यालयातील गूणवंत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला, तर विद्यालयाचे नाव यशोशिखरावर पोहचविले सन २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षे मध्ये विद्यालयातील इयत्ता बारावी मध्ये *प्रथम कु.गायत्री संतोष जाधव हिने 80.67 % गुण तर द्वितीय क्रमांक कु. अनिता त्रंबक कांदे 68.33 %गुण तसेच तृतीय क्रमांक कु. शीतल भागवत नवघरे 66.67 %गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले* तर
*इयत्ता दहावी बोर्ड परिक्षा मध्ये*
*कु.सृष्टी ज्ञानेश्वर माकुडे हिने 99.20% गुण घेऊन मानवत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. तर द्वितीय क्रमांक कु.वैष्णवी मोहन दिशागत हिने 96.80%* *तसेच तृतीय क्रमांक राधा रेवणनाथ भुजबळ हिने 93.80 % गुण घेऊन घवघवीत यश मिळविले त्यांबद्दल* विद्यालयाच्या वतीने
आज दिनांक 28/05/2024 रोजी नेताजी सुभाष शिक्षण संस्थेचे सन्माननिय भाऊ मदनरावजी नाईक यांच्या प्रमूख उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गूण गौरव करून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमूख पाहूणे मिथिलेशजी नाईक , नेताजी सुभाष महाविद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री नंदकुमारजी सिसोदिया,उपमुख्याध्यापक श्री उद्धवरावजी हरकळ पाटील,प्रा. शिवराजजी नाईक, बाळासाहेब मारोतराव नाईक , पर्यवेक्षक संजयजी लाड कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री एस. के. रणवीर, श्रीमती कुसुमताई कनकुटे मॅडम श्री. शेषेरावजी ढगे पाटील ,श्री अशोकरावजी काळे, श्री सुनीलजी लाड , श्री गणेशजी शिरसकर ,श्री संजयजी जाधव , श्री अशोकजी बैस ,श्री, बाजीरावजी सावंत, श्री, सदाशिवरावजी होगे पाटील , श्री दिलीपरावजी होंडे पाटील , श्री.ठमके सर, श्री दत्तरावजी अधाटे श्री भास्करराव झोल पाटील , दिगांबरजी रोकडे आदींची या वेळी उपस्थिती होती. या वेळी गूण गौरव सत्कार समारंभ कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्राध्यापक शिवराजजी नाईक यांनी केले. यावेळी नेताजी शिक्षण संस्थाचे सन्माननिय भाऊ मदनरावजी नाईक यांनी गूणवंत विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन करताना सन्माननिय भाऊ मदनरावजी नाईक म्हणाले की, आजच्या निकालामध्ये गुणवंत मुलींची संख्या जास्त असल्यामुळे त्यांचे भरभरून गूण गौरव करून कौतुक करण्यात आले. यावेळी गूणवंत विद्यार्थ्याना पुढील वाटचालीसाठी विद्यालयाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या वेळी मुख्याध्यापक तथा प्राचार्य नंदकूमारजी सिसोदिया, उपमूख्याध्यापक मा. ऊध्दवरावजी हरकाळ पाटील , श्रीमती, कुसुमताई कनकुटे मॅडम यांनी या वेळी आपल्या मनोगतातून गूणवंताचा गूण गौरव करून पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.