ताज्या घडामोडी

मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांच्या मार्गदर्शनाखाले मान्सूनपूर्व गटारे , रस्ते, नाल्या आदी स्वच्छता कामाची पाहणी

मानवत / प्रतिनिधी.

आज दिनांक 28 मे रोजी मानवत नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती कोमल सावरे यांनी मानवत शहरात सूरू असलेल्या मान्सून पूर्व कामाची पाहणी केली. दिनांक ७ जून पासून मृग नक्षत्राला सुरुवात होत आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहेत, त्यामुळे मानवत नगर परिषदेचे मान्सूनपूर्व असलेले स्वच्छता विभागाचे कामकाज पूर्ण होणे आवश्यक आहे. मानवत शहरातून शहराबाहेर जाणाऱ्या गटारे, नाल्यांमध्ये असणारा गाळ, कचरा, वाढलेली झाडे झुडपे काढून नाले स्वच्छ करण्याचे काम मानवत नगर परिषदेच्या स्वच्छता विभागा मार्फत चालू आहेत. मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाल्यास शहरातील नागरिकांच्या आरोग्य व जनजीवन प्रभावित होणार नाही याची काळजी, दखल मानवत नगर परिषद प्रशासना मार्फत घेण्यात येत आहे. गटारातील वाहत्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा अडकलेला असतो त्यामध्ये प्लास्टिकच्या कॅरीबॅग, पाण्याच्या बॉटल्स व अशा अनेक प्रकारचा घण कचरा यांची विल्हेवाट होत नाही व तो कचरा वाहून जात नाही. व हा कचरा काढून घेतल्यास पाणी वाहून जाण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाही पावसाचे पाणी तुंबून इतर भागांमध्ये पसरत नाही, यासाठी मान्सूनपूर्व गटारे, नाले स्वच्छता करण्याची तयारी मानवत नगर परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.
मानवत नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती कोमल सावरे यांच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना स्वच्छता राखण्याचे व सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. जेणे करून पाऊस पडल्या नंतर रोगराई पसरणार नाही व आरोग्यास धोका निर्माण होणार नाही तसेच मानवत नगर परिषदेला स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य या सुविधा देण्यावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा व आपल्या घरातील ओला सुखा कचरा घंटागाडीतच टाकावा. असे आवाहन स्वच्छता विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मान्सून पूर्व चालू असलेल्या स्वच्छता विभागातील कामांना श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत व त्यांच्या सोबत इतर अधिकारी कर्मचारी श्री. बांधकाम अभियंता सय्यद अन्वर , स्वच्छता निरिक्षक श्री मुंजाजी गवारे , श्री सुनील कीर्तने, श्री दीपक भदर्गे, व स्वच्छता विभागातील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

****

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.