ताज्या घडामोडी

पोलीस निरीक्षक संदिप बोरकर यांनी मानवत पो.स्टे. चा पदभार स्विकारला

*(मानवत / प्रतिनिधी.

गून्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून मानवत शहरांमध्ये पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार हे अतिशय उत्तम कार्य करीत होते.
त्यांच्या सामाजीक सलोखा कार्याची दखल घेऊन परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्रसिंग परदेशी यांच्या आदेशाने पो.नि. दिपकजी दतूंलवार यांची बदली करण्यात आली.
तर मानवत येथे *जिल्हा विशेष शाखा परभणी* व *सोनपेठ पोलीस स्टेशन इन्चार्ज* अधिकारी *स्थानिक गुन्हे शाखा* या मध्ये पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी उत्कृष्ट कार्य केले त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्याची बदली मानवत येथे करण्यात आली. पो.नि. संदिप बोरकर यांनी दिनांक २५ मे रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी मानवत पो.स्टेचा पदभार स्विकारला.
अतिशय कडक व शिस्तबद्ध पद्धतीने आणि नियमाला धरून त्यांनी कित्येक अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत. शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था व जातीय सलोखा अबाधित ठेवण्यास प्रथम प्राधान्य राहील. गून्हेगारांवर अकूंश ठेऊन आणि गुन्हेगारीवृत्तीला आळा घालून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. पोलीस निरीक्षक संदीप बोरकर हे मानवत पोलीस स्टेशनला रुजू झाल्याची वार्ता कळताच मानवत शहरातील मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना सलीम, हाफेज जावेद बागवान, समाजसेवक शेख मुस्ताक , निडर पत्रकार इरफान बागवान यांच्या सह मानवत शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या वतीने पो.नि. संदीप बोरकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अनेकांनी पूढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.