डॉक्टर गणेश जोशी यांना राज्य उत्कृष्ट महानगर अध्यक्ष पुरस्कार 2023 घोषित
नांदेड: व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेमध्ये डॉक्टर गणेश जोशी यांचे योगदान व उत्कृष्ट कार्य लक्षात घेता राज्य शासन व्हाईस ऑफ मीडिया यांच्या वतीने राज्य उत्कृष्ट महानगर अध्यक्ष 2023 चा पुरस्कार घोषित करण्यात आला, हा पुरस्कार 26 फेब्रुवारी 2024 रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे. व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना तीन वर्षांपूर्वी राज्यातील वीस संपादक एकत्र येऊन पत्रकारिता आणि पत्रकारासाठी कार्य करण्याकरिता संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली. व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेचे देशभरात प्रत्येक तालुक्यात सदस्य कार्यरत असून या संघटनेत आज 36000 पत्रकार जोडले गेले असून एवढेच नाही तर ही संघटना 30 देशापर्यंत जाऊन पोचली आहे. महाराष्ट्र मध्ये व्हाईस ऑफ मीडिया या संघटनेचे पत्रकार सदस्य साडेसहा हजार असून पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या कुटुंबासाठी कार्य करण्यास संघटना आग्रही असून संघटने कडून पत्रकाराचे प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार अधिवेशने बैठका घेतल्या जातात. त्यातून पत्रकारांच्या अडचणी सोडण्याचा प्रयत्न केला जातो. व्हाईस ऑफ मीडिया संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष श्रीनिवास भोसले जिल्हा संघटक डॉक्टर प्रवीण कुमार सेलूकर प्राध्यापक राज गायकवाड डॉक्टर भगवान सूर्यवंशी सुरेश आंबटवार शरद काटकर शिवाजी शिंदे यांच्याकडून डॉक्टर गणेश जोशी यांचे अभिनंदन करण्यात आले.