https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
सामाजीक

गोळीबार चौक जय भीम या घोषणेने दुमदुमला

नागपूर,प्रतिनिधी :-

गोळीबार चौक येथे बाबासाहेब यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी झाला. यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन लोकनेता रा.बा. कुंभारे विचार मंच यांच्या वतीने गोळीबार चौक येथे भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारत रत्न बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचे योगदान मोठ्या प्रमाणात वाचले गेले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष हरेश निमजे होते. कार्यक्रमास मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, प्रमुख पाहुणे पुरुषोत्तम सेलुकर होते. प्रमुख वक्ते आदिम चे संपादक प्रकाश निमजे यांनी बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय समाजाला समता, न्याय व स्वातंत्र्य या मूल्यांचे आधार ठेवून त्यांच्या संपूर्ण जीवनाला समर्पित केले होते. त्यांच्या आणखी जाणीव आणि त्यांच्या विचारांचा समजन अत्यंत महत्वाचे आहे. हे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले.

गोळीबार चौक तोरण, पताका आणि पंचशील ध्वजाने सजवण्यात आले होते. सर्व उपस्थित लोकांनी उत्साहात या जयंतीचा कार्यक्रम साजरा केला. पूर्ण परिसर जय भीम या घोषणेने आसमंत दुमदुमला होता.कार्यक्रमात संविधान पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

पोलीस बांधवांची कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन अरविंद गडीकर ह्यांनी केले.आभार प्रदर्शन दीपक उमरेडकर ह्यांनी केले.

 तसेच या कार्यक्रमास विनायक वाघ, मोतीराम मोहाडीकर, किशोर उमरेडकर, प्रमोद गडिकर, ओमप्रकाश पाठराबे, आशिष गडिकर, पंखेश नीमजे, प्रदीप पौनिकर, मोरेश्वर पराते व इतर बांधव मोठ्या संख्येने गोळीबार चौक येथे उपस्थित होते.

गोळीबार चौक तोरण, पताका आणि पंचशील ध्वजाने सजवण्यात आले होते. सर्व उपस्थित लोकांनी उत्साहात या जयंतीचा कार्यक्रम साजरा केला.

पूर्ण परिसर जय भीम या घोषणेने आसमंत दुमदुमला होता.कार्यक्रमात संविधान पुस्तकाचे वाटप करण्यात आले. पोलीस बांधवांची कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704