देश विदेश

जहाल नक्षली साधु मोहंदा ठार

गडचिरोली, प्रतिनिधी :-

आज गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस नक्षल चकमकीत झाली. त्या घटनास्थळावर ०१ पुरुष मृतदेह आढळून आले. मृत नक्षलीची ओळख पटली असून त्याचे नाव समीर ऊर्फ साधु लिंगा मोहंदा, वय – ३१ वर्षे, रा. तुमरकोडी, पोमके कोठी, तह. भामरागड जि. गडचिरोली येथील रहीवासी आहे.

मौजा तोडगा येथील जनआंदोलनासाठी नक्षलवाद्यांनी नागरीकांना बळजबरी सहभागी होण्यास भाग पाडले आहे असे नक्षवायांनी नुकत्याच टाकलेल्या पत्रकातून सिद्ध होते. हैराण झालेल्या नागरीकांना आणखी फुलाचन आंदोलन कायम ठेवण्याच्या हेतुने तसेच पोलीसाच्दारे राबविण्यात येणा-या नक्षलविरोधी अभियान दरम्यान मोठा घातपात करण्याची योजना नक्षलवादी कडून आखली जात आहे अशा खात्रीशिर माहिती वरुन गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्या भागात शोध अभियान राबविले असता, आज सकाळी १० वाजेच्या सुमारास उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या गट्टा ((जा.) हद्दीतील मौजा हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर सुमारे ६० ते ७० नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांना जीवे तार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने बीजीएल व इतर दारुगोळ्याच्या साह्याने तीन स्वरुपात अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येणे बाबत आवाहन केले असता, नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसावर आणखी जोरदार हल्ला चढवला. जवानांनी प्रत्युत्तरादाखलः व स्वरक्षणासाठी नक्षलवाल्याच्या दिशेने गोळीबार केला. सदरची चक्रमक ही सुमारे ३० ने ४५ मिनीटे चालू होती.

घटनास्थळावर ०१ नग देशी बनावटीची रायफल, ०१ नग भरमार रायफल, १ नग ३०३ रायफल, नास्टीचे साहित्य, एसएलआर च्या २ मॅगझिन व ३० राऊंड्स, ८ एम. एम. रायफलचे ३ राइस, १२ बोर थे ४ करा, २ पिट्ट, भरपुर प्रमाणात नक्षल लिखाण साहित्य : सॅमसंग कंपनीचा टॅब्लेट,  रेडिओ, रोख उक्कम रुपये २८,१२०/-, नक्षल कपड व ईतर नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे.

यावेळी पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटना स्थळावरून पळ काढला.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर ०१ पुरुष मृतदेह आढळून आले. मृत नक्षलीची ओळख पटली असून त्याचे नाव समीर ऊर्फ साधु लिंगा मोहंदा, वय – ३१ वर्षे, रा. तुमरकोडी, पोमके कोठी, तह. भामरागड जि. गडचिरोली येथील रहीवासी होता. त्याच्यावर, २ चकमक व २ इतर असे ४ गुन्हे दाखल असून, त्यामध्ये पोस्टे भामरागड येथे सन २०१८ साली पोलीसांना जिवे मारण्यासाठी अम्बुश लावणे यासाठी देखील गुन्हा दाखल आहे. सदर नक्षल सन २०१४-१५ साली चातगाव दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन २०१७ साली प्लाटुन क्र. ७ मध्ये आकर चा सुरक्षा गार्ड होता तसेच सन २०१८ साली कंपनी ४ मध्ये कार्यरत होता व त्यानंतर कंपणी क्रमांक १० मध्ये कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने २ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. 

 सदर जंगल परिसरात सी ६० पथकांच्या जवानांचे नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असून, जंगल, परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबविण्यात येत आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.