देश विदेश

गडचिरोलीत पोलीस नक्षल चकमक,एक ठार

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली जिल्ह्यात आज पोलीस नक्षलवाद यांची जोरदार चकमक झाली असून एक  नक्षल ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.

एतपली तालुक्यातील जांबिया गट्टा पोलीस मदत केंद्र अंतर्गत येत असलेया मुस्पर्शी जंगल परिसरात सकाळी १० वाजता दरम्यान पोलीस नक्षल यांची चकमक झाली. सी ६० जवान नक्षल विरोधी मोहीम राबवत असताना दाबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस जवानाच्या दिशेने जोरदार गोळीबार सुरु केला.यास सी ६० च्या जवानांनी जोरदार प्रत्युतर दिले.

या चकमकीत  एक नक्षलवादिला ठार मारण्यात पोलिसाना यश मिळाले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा व नक्षल साहित्य जप्त करण्यात आले अशी माहिती आहे. सदर परिसर हा घनदाट जंगलाचा आहे या ठिकाणी सर्चिंग ऑपरेशन सुरु आहे. अजूनही चकमक सुरु असल्याची माहिती आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.