महाराष्ट्र

सावरकर गौरव यात्रा गडचिरोली जिल्ह्यात येणार

गडचिरोली,प्रतिनिधी :-

स्वातंत्रवीर सावरकर यांच्या कामगिरीचे स्मरण देण्यासाठी राज्यभरात भाजपा आणि शिवसेने तर्फे सावरकर गौरव यात्रा ची सुरुवात झाली असून ती नव्या पिढीला सावरकर यांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे.

सदर हि यात्रा गडचिरोलीला ४ एप्रिल ला निघणार आहे.अशी माहिती आज गडचिरोली चे आमदार डॉ.देवराव होळी यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली. यावेळी पत्रकार परिषदेल शिवसेनेचे संपर्कप्रमुख हेमंत जम्बेवार, जिल्हा भाजपा महामंत्री प्रमोद पिपरे,गडचिरोली शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,माजी नगरसेवक केशव निम्बोड,हेमंत बोरकुटे,वाढई,आदी उपस्थित होते.

राज्यातील सर्व २८८ मतदार संघात हि गौरव यात्रा जाणार आहे. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टी च्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष आमदार बावनकुळे तसेच शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी,पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.