https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथील नेताजी सुभाष माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी 2002 च्या मित्र परिवारांचा स्नेह – मिलन सोहळा संपन्न

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील वैभवशाली इतिहास असलेल्या नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी 2002 च्या बॅचचा स्नेहमीलन सोहळा अतिशय दिमाखातमानवत येथील रेणुका मंगल कार्यालय या ठिकाणी अतिशय दिमाखात दोन दिवसीय सत्रात साजरा झाला. यावेळी कार्यक्रमासाठी एकूण 102 मुले व मुली उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमा निमित्त गुरु पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमासाठी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आ. श्री. गोपिकिशनजी सिखवाल सर, आ. श्री, रामेश्वरजी भराडिया सर, आ. श्री .दत्तात्रेय नेवरेकर सर,आ. श्री. शिवराज येलमटे सर,आ. श्री. प्रकाशजी काकडे सर, आ. श्री केशवरावजी शिंदे सर, आ. श्री. मानसिंगजी मोरे सर,आ. श्री, प्रल्हादबूवा पुरी सर, श्री. विनायकराव कुलकर्णी सर, श्री अशोकराव काळे सर, श्री गोविंदजी सीखवाल सर, श्री. उत्तमराव थोंबाळ सर, श्री रामेश्वरजी मुंदडा सर, श्री. ऊध्दवरावजी हारकाळ स आदीसह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त सर्व विद्यार्थ्यांचा अल्पपरिचय व सर्व शिक्षकांचा गुरु पूजनाचा कार्यक्रम अतिशय दिमाखात साजरा झाला या स्नेह मिलनासाठी सर्व संयोजन समितीने यशस्वीपणे कामकाज पार पाडले या वेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन
श्रीमती पूनमताई वट्मवार , शशिकांतजी नेवरेकर, विष्णूभाऊ लाड यांनी केले. तर सर्वमान्यवरांचे शब्दसुमनानी स्वागत श्रीमती स्नेहाताई प्रितम लकडे हिने केले. या वेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार डाॅ. निरजसा दगडू , डाॅ. माधवीताई कोकरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704