ताज्या घडामोडी

.प्रा. डॉ.मालोजी फुगारे यांचे निधन ; आज सकाळी १० वाजता नांदेडमध्ये अंत्यसंस्कार- डॉ. दिलीप फुगारे यांना बंधू वियोग

नांदेड,( प्रतिनिधी)- येथील सायन्स महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्रा. डॉ. मालोजी खंडोजी उर्फ एम.के. फुगारे यांचे काल दि. १७ मे रोजी मुंबईत रस्ता अपघातात निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. वैद्यकीय व्यवसायात असणाऱ्या मुलगा आणि मुलीकडे ते सपत्नीक वास्तव्यासाठी होते. काल दिनांक १७ मे रोजी संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी निघाले असता एका भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले असता आज १८ मे रोजी पहाटे २ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. शेतकरी चौक तरोडा नाका जंगमवाडी येथील रवीनगरच्या त्यांच्या निवासस्थानी प्रा. डॉ. फुगारे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दिवंगत प्रा. डॉ. एम. के. फुगारे यांच्या पार्थिवावर उद्या रविवार, दि. १९ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता नांदेड येथील गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले, एक मुलगी, डॉ. दिलीप फुगारे, गंगाधर फुगारे हे धाकटे बंधू आणि भाची सावित्री अविनाश गायकवाड असा परिवार आहे. डॉ.मालोजी फुगारे यांचे निधन ;
आज सकाळी १० वाजता नांदेडमध्ये अंत्यसंस्कार
————–
डॉ. दिलीप फुगारे यांना बंधू वियोग
———

नांदेड,( प्रतिनिधी)- येथील सायन्स महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे वरिष्ठ प्रा. डॉ. मालोजी खंडोजी उर्फ एम.के. फुगारे यांचे काल दि. १७ मे रोजी मुंबईत रस्ता अपघातात निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. वैद्यकीय व्यवसायात असणाऱ्या मुलगा आणि मुलीकडे ते सपत्नीक वास्तव्यासाठी होते. काल दिनांक १७ मे रोजी संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी निघाले असता एका भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले असता आज १८ मे रोजी पहाटे २ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. शेतकरी चौक तरोडा नाका जंगमवाडी येथील रवीनगरच्या त्यांच्या निवासस्थानी प्रा. डॉ. फुगारे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दिवंगत प्रा. डॉ. एम. के. फुगारे यांच्या पार्थिवावर उद्या रविवार, दि. १९ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजता नांदेड येथील गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले, एक मुलगी, डॉ. दिलीप फुगारे, गंगाधर फुगारे हे धाकटे बंधू आणि भाची सावित्री अविनाश गायकवाड असा परिवार आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.