https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

निवेदा मंजूर होऊन ही मूख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील कोल्हा कोथळा रस्त्याचे कामे रखडले.

*मानवत / प्रतिनिधी.*

मानवत येथील भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा, महाराष्ट्र राज्य चिटणीस प्रा. अनंत वाबुराव गोलाईत (गहिलोत)दिनांक- 03/05/2024. यांना, मा. कार्यकारी अभियंता, P.M.G.S. योजना मुख्यमत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन अंतर्गत कोल्हा-कोथाळा रस्ता कामा संदर्भात मुग्रायो- २०२२/पीके.१७२/डॅम-४ दि. १२/१२/२०२२. उपरोक्त संदर्भीय विषयी आपणास विनंती करण्यात येते की, मुख्यमुत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन अंतर्गत दि. १२/१२/ २०२२ रोजी महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागाने मानवत तालुक्यातील एकुण १४ कामांची यादी शासन परिपत्रका सोबत आपल्या कार्यालयास पाठविली आपल्या कार्यालयाने सदर यादीतील कोल्हा- कोथाळा, राजुरा या रस्ते कामाची जिल्हा नियोजन परभणी येथील बैठकीत मंजुरी घेउन सलग ८ ते ९ वेळा निविदा प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर आपल्या कार्यालया मार्फत असे समजले की, अल्फिया कन्स्ट्रक्शन परळी यांना या कामाची निविदा मंजुर करण्यात आली. डिसेंबर २०२२ पासून ते आज पर्यंत १६ महिन्यांचा कालावधी उलटुन गेला असून या रस्त्याच्या कामाची प्रगती शुन्य आहे. सदर रस्त्याच्या कामाची निविदा भरण्यास कंत्राटदार उत्सुक नसल्याचे कारण इस्टिमेट कमी दराचे व कमी रक्कमेचे आहे असे समजले. सदर रस्त्याच्या कामासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून वाढीव बजेट साठी आपल्या कार्यालया कडून काही प्रयत्न करण्यात आले आहे का, नसेल तर आम्हाला कळवावे, आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न करू कारण संबंधित रस्त्यावरील नागरिकांना रहदारीसाठी मरण यातना भोगाव्या लागत आहे.
तसेच मंजुर झालेल्या १४ कामांपैकी इतर कोण कोणत्या रस्त्याची कामे प्रगती पथावर आहेत हे लेखी कळवावे. तरी सदर कोल्हा- कोथाळा रस्ता लवकरात लवकर तयार करून नागरिकांच्या सोईसाठी उपलब्ध करावा अशी मागणी अनंत गोलाईत प्रदेश चिटणीस भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र राज्य यांनी प्रशासनाकडे केली आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704