https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत पो.स्टे मध्ये भारतीय दंड संहिता १८६० प्रमाणे कलम ५०४, ५०६ , आरोपी विरोधात गून्हा दाखल.

मानवत / प्रतिनिधी.
मानवत पोलिस स्टेशन मध्ये
दिनांक 11/05/2024 मी आनंतराव शेषेराव शिदे, वय 65 वर्ष, जात मराठा, व्यवसाय शेती, रा. वझुर खु ता मानवत यांनी समक्ष पोलीस स्टेशन मानवत येथे हजर येवुत तोंडी सांगुन फिर्याद दाखल केली , वरील ठिकणी माझी पत्नी व दोन मुला सह राहत असुन शेती करून उदरनिर्वाह करतो. मला दोन मुले असुन मोठा मुलगा नामे सतिश आंनतराव शिदे हा आहे. व माझा लहाण मुलगा नामे इश्वर हा सध्या माझे सोबत राहतो. मला एकुन सहा एकर शेती असुन ती वझुर खु शिवारात गट क्रमाक 59 मध्ये आहे अजुन मी शेतीची वाटनी केलेली नाही. सध्या माझे नावावर आहे. दिनांक 10/05/2024 रोजी सकाळी 10.00 वा. सु. मी माझे शेतात पळाटीला पाळी घालण्यासाठी टँक्टर घेवुन जात असताना माझा मोठा मुलगा नामे सतिश आंनतराव शिदे, वय 35 वर्ष, माझे जवळ आला. व मला म्हणाला की वावर माझ्या नावावर का करत नाही या कारणावरून माझे जवळ येवुन मला शिवीगाळ करून तु जर मला शेती माझे नावावर केली नाही तर तुला व तुझ्या बायकोला खतम करून टाकतो. अशी जिवे मारण्याची धमकी दिली.
म्हणुन माझी त्याचे विरुध्द तक्रार आहे. माझी तक्रार माझे सागितल्या प्रमाणे संगणकावर टंकलिखीत केली वाचुन पाहिली बरोबर व खरी आहे, तक्रार दाखल करण्यात आली आहे.
धमकी देणार्‍या आरोपीस अटक करावी व माझ्या व माझ्या पत्नीच्या जीवाचे रक्षण करावे अशी मागणी अनंतराव शिंदे यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704