https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत शहरातील नालीवरील गड्डे व रस्त्याच्या कडेवरील नाम फलक धोकादायक* *नगर पालिका प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज

*मानवत / प्रतिनिधी.*

*मानवत नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सांडपाणी वाहून नेणार्‍या गटारावरील उघडे खड्डे व रस्त्याच्या काठावरील बॅनर नागरिकांना व वाहन चालकांना धोकादायक बनत चालले असून या कडे कर्तव्यदक्ष नगर पालिका प्रशासनाने लक्ष देऊन उपाय योजना करण्याची गरज सूज्ञ नागरिकातून व्यक्त केल्या जात आहे.*
*सविस्तर वृत्त असे की,*
*मानवत नगर पालिका शुध्द जल चांगले रस्ते, स्वच्छ व सुंदर शहर म्हणून सफाई मोहिम नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपाय योजना राबवित असते. त्यामूळे नागरिकांचे आरोग्य आबादीत राहत आहे.*
*त्यामूळे मराठवाड्यात मानवत नगर परिषदेच्या कार्याची दखल नेहमीच नागरिक घेतात मानवत शहराचा व्याप वाढत असल्यामूळे अनेक नगरांची या मध्ये भर पडत आहे. शहरीकरणामूळे शहरातील अनेक भागात सांडपाणी वाहूण नेणार्‍या नाल्या व त्यावरील उघडे ढाप्पे आणि शहरातील मेन रोडच्या काठावर व्यापारी व नागरीकांनी लावलेले फलक मात्र अपघातास निमत्रंण देत आहे.*
*याकडे मानवत नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी यांनी शहरातील नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेऊन खबरदारीचा उपाय योजविण्याची गरज सुज्ञ नागरिकांतून व्यक्त करीत आहे.*

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704