मानवत येथे पं,पु. गूरूवर्य श्री, श्री, श्री, रविशंकरजी यांच्या प्रकट दिना निमित्त रक्तदान शिबीर संपन्न.

मानवत / प्रतिनिधी
आर्ट ऑफ लिविंग परिवाराचे संस्थापक गुरुवर्य श्री श्री श्री रविशंकर यांच्या प्रगटदिन निमित्त दरवर्षी १३ मे रोजी अविरत गेल्या ९ वर्षांपासून मानवत शहरात रक्तदान शिबिर घेतल्या जातात. मे महिन्यात प्रत्येक ठिकाणी रक्ताची टंचाई भासत असते रक्ताची मागणी जास्त व रक्तदान शिबिर कमी यामुळे रक्त टंचाई भासत असते. अशाच टंचाईच्या काळात रक्तदान शिबिर घेऊन आर्ट ऑफ लिविंग परिवार आपली सामाजिक बांधिलकी पार पाडत आहे.
मानवत येथील आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्या वतीने १३ मे रोजी स्वामी दिव्य चैतन्य गार्डन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिराचे उद्घाटन मानवत नगर पालिकेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षक भास्कर मगर, सुनिल बोरबने, सूर्य प्रकाश तिवारी, दिपक शर्मा, मनिष उपलंचेवार, डॉ.विजयकुमार तोष्णीवाल यांचे सह मानवत शहरातील आर्ट ऑफ लिविंगचे साधक या वेळी उपस्थित होते.
मानवत शहरात गेल्या ९ वर्षापासून १३ मे रोजी मानवत शहरात रक्तदान शिबिर आर्ट ऑफ लिविंग परिवाराकडून आयोजित केले जाते दरवर्षी मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांचे रक्त संकलन करून जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय रक्त पेढीला पाठविल्या जाते.
यावर्षीही मोठ्याप्रमाणात रक्तदात्यांनी रक्तदान करण्यासाठी नाव नोंदणी केली होती. त्यामुळे यावर्षी देखील रक्तदात्यांचा आकडा मोठा असल्याचे सांगण्यात आले.
या वेळी रक्तदान शिबिरासाठी परभणी जिल्हा रुग्णालयातून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश लखमावार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. मनीषा केंद्रे , डॉ. कृष्णा अबुज रक्त संक्रमण अधिकारी, संजय वाघमारे रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी , विठ्ठल शिंदे व आत्माराम जटाळे यांनी मोठ्या प्रमाणात क्तदात्यांकडून रक्तदान करवून घेतले .
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अशोक भंडारे,कार्तिक तळेकर,प्रभू वाघमारे,रामस्वरूप सारडा , सौ. तिवारी, अंकुश गरड ,नारायण थावरे, गोपाळ टोपे,हरिभाऊ शिसोदे, शाम दहे, अवि दहे, बाळू शास्त्री,विशाल भालेराव,अरुण कच्छवे, संजय बाहेती, निवृत्ती गोरे, प्रकाश कदम, परशुराम महात्मे,राजू बुरलेवार, रंगनाथ कोंडगिर,संतोष रुद्रकंठवार,राजेश टोपे, दत्ता कुठे, दत्ता ठोंबरे, रवींद्र ठाकूर, बाबासाहेब अवचार, सतीश अवचार, गोविंद अवचार,संजय हिबारे, दीपक महिपाल , रामनिरंजन सारडा , बाचेवार लक्ष्मीनारायण, सचिन हिबारे, हरिभाऊ मुळे, ईश्वर अवचार, सोमनाथ लासे,आंबेकर रामचंद्र, सुदाम रासवे,सौ.गरड ताई , भागवत आगे , ठोंबरे सर ,हरकळ सर, नवनाथ कोल्हे , स्नेहा झंवर आदींनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
***