अर्धापूर येथील मुलांचे वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु
नांदेड दि. 14 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह अर्धापूर येथे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबतची प्रवेश प्रक्रीया सुरु झाली आहे. अर्धापूर तालुक्यातील इयत्ता आठवी, अकरावी व पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या इच्छूक व पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
अर्धापूर तालुक्यातील गावातील विद्यार्थी जे तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत अशा इच्छूक व पात्र विद्यार्थी व पालकांनी इयत्ता आठवी, अकरावी व पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज मुलांचे वसतिगृह, ग्रामीण रुग्णालय बाजूला, पांगरी रोड, अर्धापूर येथील कार्यालयात विनामुल्य भरुन द्यावेत. विहित कालावधीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही यांची नोंद विद्यार्थी व पालकांनी घ्यावी, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
0000