रस्त्यावर कचरा टाकणार्यावर कोण ? कारवाई करणार, सामान्य नागरिकांना पडला प्रश्न.
*मानवत / तप्रतिनिधी.*
*मानवत नगर परिषदेचे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवीला असून त्या वेळेस नागरिकांना आवाहन पण केले असून एका ठरावा द्बारे दंडात्मक कारवाईची भिती पण नागरीकांना दाखवून आपला कचरा घंटा गाडीत टाकण्याचे आवाहन करण्यात आले. पण आज शहरातील अनेक भागात
सुज्ञ नागरीक रस्त्याच्याकडेवर आपला केरकचरा टाकून मोकळे होत आहे. त्यामूळे सामान्य नागरीकांनाच कायद्या चा बडगा उगारायचा का ? असा प्रश्न सामान्य नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.
सविस्तर वृत्त असे की,
मानवत शहरातील स्वच्छता करण्यासाठी मानवत नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मूख्याधिकारी यांनी मोठी यंत्रना उभी केली असून त्या मध्ये भरच पडत आहे.
शहरातील घण कचरा ऊचलण्यासाठी घंटागाडी सोबत टॅक्टरची पण जोड लावण्यात आली आहे. शहरातील चौका चौकात व प्रभागात फेरी मारून घंडागाड्या घणकचरा संकलन करीत आहे. पण शहरातील अनेक भागात सूज्ञ नागरीक हे घणकचरा रस्त्याच्याकडेवर टाकून मोकळे होत असल्याने अनेक भागात कचर्याचे ढिगारे पाहावयास मिळत आहे. कचर्या सोबत शहरात प्लाॅस्टिक बंदी असून ही मोठ्या प्रमाणात चौका चौकात कचर्या सोबत प्लाॅस्टिक बॅग पाहावयास मिळत असल्यामूळे आता न.पा.प्रशासनाचा सफाई विभाग कारवाई करणार का ? असा प्रश्न नागरिकातून व्यक्त केली जात आहे.
***