ताज्या घडामोडी
नांदेडमध्ये गोळीबार करत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला लुटले

नांदेड:
नांदेड शहरातील अष्टविनायक नगर येथे दोन अज्ञातांनी गोळीबार करत एका व्यक्तीकडील पैसे लुटले. रवींद्र जोशी यांच्या घरासमोर हा गोळीबार झाला. बंदुकीतून 3 राऊंड फायर करण्यात आले. जोशींनी बँकेतून पैसे काढून आणले होते. तिथे दोन अज्ञात व्यक्ती आले आणि गोळीबार करत जोशींकडील पैसे व मोबाईल घेऊन पसार झाले. यात जोशी यांच्या हाताला दुखापत झाली आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे.