स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा ‘ उपक्रमाचे आयोजन

उदगीर दिनांक: येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देशात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे काढण्यात आलेल्या परिपत्रक नुसार विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ पवार, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.गणेश तोलसरवाड, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ज्योती तारे, ग्रंथालय विभागाचे प्रमुख डॉ.शेषनारायण जाधव, रासेयो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.अमर तांदळे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.राहुल पुंडगे, प्रा.राशिद दाईमी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमाअंतर्गत सामूहिक वाचन, वाचन संवाद, वाचन कौशल्य कार्यशाळा, पुस्तक परीक्षण, कथन स्पर्धा, लेखक व विद्यार्थी यांच्यातील संवाद, ग्रंथ प्रदर्शन हे उपक्रम राबविण्यात येत आहे. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. असिफ दाईमी, प्रा. आकाश कांबळे, उषा गायकवाड, शकुंतला सोनकांबळे, यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.