मानवतेच्या रक्षणासाठी श्री.गुरू गोविंद सिंघजी यांनी लढाया लढल्या -डॉ. राजवंतसिंघ कदंब
नांदेड:( दि.८ जानेवारी २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला समितीतर्फे दि.६ जानेवारी रोजी श्री.गुरुगोविंद सिंघजी यांच्या जयंतीनिमित्त ‘श्री गुरु गोविंद सिंघजी यांचे राष्ट्रनिर्माणात योगदान’ या विषयावर नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयातील डॉ. राजवंत सिंघ कदंब यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.
‘जगामध्ये जेवढ्या लढाया झाल्या; त्या धन, स्त्री आणि जमीन यांच्यासाठी झाल्या असतील; परंतु श्री. गुरु गोविंद सिंघजी यांनी मानवतेच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घेऊन सर्व लढाया जिंकल्या. परंतु आपले कुठलेही साम्राज्य त्यांनी निर्माण केले नाही. शस्त्र आणि शास्त्र याद्वारे संपूर्ण जगाला मानवतेच्या रक्षणाचा संदेश दिला; असे प्रतिपादन डॉ. राजवंत सिंघ कदंब यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे होत्या. याप्रसंगी विचारपिठावर व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ.संदीप पाईकराव उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री. गुरु गोविंद सिंघजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे म्हणाल्या की, श्री. गुरु गोविंद सिंघजी यांनी खालसा पंथाच्या माध्यमातून दिलेल्या समानता, श्रमनिष्ठा आणि सेवाभावाच्या संदेशाची आज संपूर्ण भारतालाच नव्हे तर विश्वाला अत्यंत आवश्यकता आहे.
प्रारंभी प्रास्ताविक डॉ. साईनाथ शाहू यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संदीप पाईकराव यांनी केले तर आभार प्रा. शांतुलाल मावसकर यांनी मानले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, समिती सदस्य डॉ.गौतम दुथडे, डॉ.मीरा फड, डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड, ग्रंथपाल डॉ. कैलास वडजे, डॉ.राजरत्न सोनटक्के, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ. एल. व्हि. पद्माराणी राव, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.शिवाजी सूर्यवंशी, डॉ. कैलास इंगोले, डॉ. रत्नमाला मस्के, डॉ. प्रवीण मिरकुटे, डॉ.अजय मुठे, डॉ. संजय नंनवरे, डॉ. रमेश चील्लावार, डॉ. निलेश चव्हाण, डॉ. संभाजी वर्ताळे, डॉ. संजय जगताप, डॉ.अजय गव्हाणे, डॉ. वीरभद्र स्वामी, डॉ. रामराज गावंडे, डॉ. शिवराज शिरसाठ, डॉ. संदीप खानसोळे, डॉ. डी.डी.भोसले, डॉ. एस.एम. दुर्राणी, प्रा. भारती सुवर्णकार, डॉ. दीप्ती तोटावार, प्रा. राजश्री भोपाळे, डॉ. एकनाथ मिरकुटे आदी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.