जय हिंद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थीनीने पटकावले गोल्ड मेडल .

उदगीर दिनांक : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय हिंद पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज उदगीर मधील वर्ग 4 थी मध्ये शिकणारी मनस्वी मनोज कलबुर्गे या विद्यार्थीनीने दिल्ली येथे पार पडलेल्या नॅशनल मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये वुशू कुग फु मार्शल आर्ट स्पर्धेत वजन गट 6 ते 10 या प्रकारात गोल्ड मेडल पटकावत शाळेचे व उदगीर शहराचे नाव राष्ट्रीय पातळीवर उंचावले आहे.
नॅशनल मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेसाठी उदगीर शहरातून ग्रँड मास्तर बी चंद्रकांत यांच्या मार्गदर्शनाखाली बँगलोर येथे मनस्वी मनोज कलबुर्गे हिची राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत 350 मुले व 150 मुली देशभरातून सहभागी झाल्या होत्या. मनस्वी हिला उदगीरचे प्रशिक्षक मारोती सोळुंके व बालाजी सोळुंके यांनी मार्गदर्शन केले.
सदरील नॅशनल मिक्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये विद्यार्थीनीनी मिळवलेल्या यशाबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप, प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी, जय हिंद पब्लिक स्कूलचे प्राचार्य संजय हट्टे, नॉबेट समन्वयक मनोरमा शास्त्री, उपप्राचार्य सतिश वाघमारे, यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.