ताज्या घडामोडी

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग यांच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगिन विकासासाठी महिला उद्योगाला भरारी

मानवत येथील *स्वरूप महिला बचत गटाला* मूख्याधिकारी, श्रीमती कोमल सावरे यांच्याहस्ते चारलक्ष रूपयाचा धनादेश वाटप

मानवत / प्रतिनिधी.

मानवत नगर परिषदेच्या वतीने मानवत शहरात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाला भरारी देण्यासाठी अंतर्गत बीज भांडवल यासाठी *स्वरूप महिला* बचत गटाला चार लक्ष रुपयाचा अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात आले. आज धनादेश मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आला. या प्रसंगी *स्वरूप महिला बचत गटा* च्या महिला पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सविस्तर वृत्त असे की,
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग *( PMFME )* या योजने अंतर्गत स्वयं सहायता बचत गटाच्या सदस्यांना बीज भांडवल, भांडवली गुंतवणुकीसाठी अर्थसहाय्य जसे वैयक्तिक लाभार्थी, स्वयं सहायता बचत गटातील सदस्य, सामाईक पायाभूत सुविधा, मार्केटिंग व ब्रँडिंग आणि प्रशिक्षण या घटकाकरीता लाभ देण्यात येत आहे. योजनेचा मुख्य हेतू हा महिलांचा जास्तीत जास्त सहभाग नोंदविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत योजने अंतर्गत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांचे सक्षमीकरण रोजगार निर्मिती, प्रायोगिक तंत्रज्ञान, गुणवत्ता वाढ,स्वच्छता यावर विशेष लक्ष असून विशेष प्राविण्य असलेल्या महिला बेरोजगार युवक आदिवासी यांना योजनेतील विविध घटकांतर्गत आर्थिक मदत केली जात आहे. या योजने अंतर्गत मानवत शहरातील *स्वरूप महिला बचत गट* या बचत गटाला चार लक्ष रुपयाचा धनादेश मानवत नगर परिषदेच्या मूख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती कोमल सावरे यांच्या हस्ते बचत गटातील सर्व सदस्यांना यावेळी स्वाधीन करण्यात आला. या वेळी अधिक माहिती देताना मानवत नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे या म्हणाल्या की मानवत शहरांमध्ये महिलांनी वेगवेगळे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा व आपल्या उद्योग धंद्याला भरारी द्यावी यासाठी मानवत नगर परिषद प्रशासन यांच्या मार्फत लोक कल्याणकारी शासनाच्या विविध वेग वेगळ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मानवत नगर परिषद प्रशासन सक्षम व कटिबद्ध असून लोक कल्याणकारी सरकारच्या विविध योजनेमूळे महिलांना स्वावलंबी बनण्यास मदत होते व रोजगार उपलब्ध होतो. या व इतर अशा अनेक योजनांचा लाभ मानवत शहरातील महिलांनी 100% टक्के घ्यावा असे आवाहन यावेळी बोलतांना मानवत नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती कोमल सावरे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला मानवत नगर परिषदेचे बांधकाम अभियंता श्री सय्यद अन्वर , कार्यालयीन अधिक्षक श्री.भगवानराव शिंदे , लेखापाल श्री मंगेशसा खोडवे , अंतर्गत लेखा परिक्षक श्री महेश कदम , कर निरिक्षक श्री भारत पवार, श्री राजेश शर्मा, विद्यूत अभियंता श्री शतानिक जोशी , संगणक अभियंता श्री संतोष खरात , समूदाय संघटक श्री. हनुमंत बिडवे आदीसह मानवत नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.