https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
क्राईम

गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या दोन रायफली जप्त

गडचिरोली,प्रतिनिधी :-

आज गडचिरोली पोलीस दलाने नक्षलवाद्यांनी जंगल पुरुन ठेवलेल्या २ रायफली जप्त केल्या. जंगलात लपवून ठेवलेल्या या  ०२ रायफली गडचिरोली पोलीस दलाने केल्या जप्त केल्या आहेत. नक्षलवाद्यांच्या घातपाती कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचे नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. टीसीओसी कालावधीत नक्षलवाद्यांकडून देशविघातक कृत्यांना वेळीच आळा घालण्याच्या दृष्टीने पोलीसांकडून प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक २१/०२/२०२३ रोजीचे सकाळी १०:०० वा. चे सुमारास ‘उपविभाग पेंढरी अंतर्गत पोस्टे जारावंडी हददीतील जंगल परिसरात मिळालेल्या गोपनिय खबरीच्या आधारे गडचिरोली पोलीस दल, सिआरपीएफ व एसआरपीएफ चे अधिकारी व जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवेलेल्या ०२ रायफली हस्तगत केल्या. हस्तगत करण्यात आलेल्या रायफलीत ०१ सिंगल बॅरल १२ बोअर रायफल व ०१ एसएसआर रायफलचा समावेश आहे.

सदर अभियान पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता,अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुजीतकुमार चव्हान, प्रभारी अधिकारी पोस्टे जारावंडी, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोनि. धर्मेंद्र कुमार व राज्य राखीव पोलीस दलाचे पोउपनि श्री. कांदळकर व जवान यांनी यशस्वीरित्या पार पाडले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704