गडचिरोली,प्रतिनिधी :-
शिवाजी महाराज हे एक पराक्रमी योद्धा होते ते सुस्वभावी, लढवय्ये व कर्तव्यदक्ष राजे होते. त्यांनी स्वकर्तृत्व व पराक्रमाने अनेक किल्ले काबीज केले. त्यांच्या पराक्रमाचा व विचारांचा आदर्श घेऊन युवकांनी कार्य करावे व आपल्या जीवनात प्रगती करावी. शिवाजी महाराजांचे विचार व कार्य आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन भाजपचे जिल्हा महामंत्री तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे यांनी केले. विसापूर येथे आयोजित शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शिवराय युवा मंडळ विसापूर च्या वतीने विसापूर येथील शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे रामकिरीत यादव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे, राजुभाऊ कावळे , नंदूजी कुमरे लालाजी पाल विशाल उरकुडे विकास देशमुख सुरज बावनवाडे शुभम कोटगले कुमोद कोटगले रुपेश मंडकवार रुकेश कोटगले चेतक भोयर गौरव चांदेकर कुसमाकर भोयर व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सर्वप्रथम विसापूर वार्डातुन छत्रपती शिवाजी महाराजांची रैली काढण्यात आली. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विधिवत पुजा करून माल्यार्पण करण्यात आले. शिवाजी महाराजांचा पाळणा गाऊन शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमात विसापूर वार्डातील पुरुष महिला व युवक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आश्रय खेवले, अनिकेत झरकर गणेश बानबले , विनोद खेवले निलेश म्हशाखेत्री, निलेश मारबते स्वप्निल कोटगले, दुर्योधन म्हशाखेत्री, कुणाल जवादे गणेश कोटगले, दूधराम म्हशाखेत्री आदींनी परिश्रम घेतले.
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.