https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
क्राईम

गडचिरोलीची विजया महिला नागरी संस्थेत फसवणूक

गडचिरोली,प्रतिनिधी :-

गडचिरोली शहरात मागील वीस वर्षापासून प्रसिद्ध असलेली विजया नागरी पतसंस्थेत 67 लाखाची रक्कम गुंतवणूक करून दाम दुप्पट पैसे देण्याचा आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली असल्याची खळबळ जनक माहिती आज पत्रकार परिषदेत उघडकीस आली. सदर  माहिती नवेगाव परिसरातील नागरिकांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपबितीसह सांगितली.

या सर्व आर्थिक फसवणूक झालेल्या लोकांपैकी बबिता समारू गुलात्रस यांनी सुध्दा, विजयाताई शरदराव गद्देवार अध्यक्ष विजया महिला नागरी पतसंस्था यांनी, आपली पाच लाखाची फसवणूक केल्याची तक्रार 9 /2/2023 रोजी पोलिस ठाण्यात केली होती. तक्रार असताना सुध्दा गडचिरोली पोलिस ठाण्यात विजया महिला नागरी पतसंस्थे विरुध्द कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, लाखोंच्या घरात फसवणूक होऊन सुध्दा गडचिरोली पोलिसांनी तक्रारीवर कोणतीच कारवाई केली नाही. यावरून कोणत्यातरी राजकीय पक्षांच्या नेत्याच्या दबाब आल्याने पोलिसांनी संशयित भूमिका घेतली की काय अशी शंका पीडितांना होत आहे.

चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे या पत संस्थेत मामिडवार नावाच्या व्यवस्थापकाने आर्थिक घबाड केली असून सहायक संस्था निबंधकाने कोणतीही कारवाई केली नाही यावरून सहायक संस्था निबंधकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात येत असल्याची माहिती काही लोकांनी बोलून दाखवली.

विजया महिला नागरी पतसंस्थेच्या लोकांनी, 67 लाखाची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार पिडीतांनी पोलिसांना केली होती, परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने पीडितांनी पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन सदर पतसंस्थेविरुध्द कारवाई करावी अशी विनंती काल केली होती.

सदर तक्रारीची दखल घेऊन ताबडतोब गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक यांनी दिल्यामुळे काल रात्री  विजया महिला नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापक मंगेश नरड यांच्या विरोधात कलम 406,409,420,467,468, 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संस्थेच्या संचालक विरुध्द कोणतीही कारवाई करण्यात आली नाही हे विशेष

सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार अरविंद कतलाम स्वतः करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नेहमी प्रमाणे पुढील तपास होणारच आहे, परंतु पीडितांना न्याय मिळवून बुडलेला पैसा लवकर परत मिळेल, अशी पीडितांची अपेक्षा आज पत्रकार परिषदेत दिसन आली होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704