https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
कोरोनामहाराष्ट्र

कोरोनामुळे निधन झालेल्या कर्जदारांची माहिती सादर करण्याचे आदेश

पुणे,प्रतिनिधी :-

कोरोनामुळे निधन झालेल्या थकीत कर्जदारांची माहिती लवकरात लवकर प्राधान्याने विहित नमुन्यात सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी 11 नोव्हेंबर 2022 रोजी एका पत्रकाद्वारे राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधक यांना दिलेले आहे.

    पत्रकात म्हटले आहे की, कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात उद्भवलेल्या भीषण परिस्थितीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. कोरोना कालावधीमध्ये घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या कुटुंबांना मोठी आर्थिक झळ बसलेली आहे, मयत कर्जदाराचे राहते घर व इतर मालमत्ता तारण असल्यास अशावेळी त्यांच्या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे यातून त्यांना काय दिलासा देता येईल या संदर्भात शासन स्तरावर निर्णय घेण्यासाठी मयत कर्जदारांची माहिती गोळा करण्यात येत आहे.

     आपल्या विभागातील जिल्ह्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँक नागरी सहकारी बँका व नागरी सहकारी पतसंस्था मधील कोरोनामुळे निधन झालेल्या थकित कर्जदारांची माहिती पत्रकात दिलेल्या नमुन्यांमध्ये लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी राज्यातील सर्व विभागीय सहनिबंधक व जिल्हा निबंधकांना दिले आहे. सदर माहिती comm.urban@gmail.com या ईमेल वर सादर soft copy सह पाठवण्याचे सहकार आयुक्तांचे आदेश आहेत.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704