https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आरोग्य व शिक्षण

व्यसनमुक्त बालक जतन संवाद अभियान

गडचिरोली,प्रतिनिधी :-  

गुरुदेव उच्च प्राथमिक विद्यालय गडचिरोली येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती व बाल दिनाच्या निमित्ताने व्यसनमुक्त बालक जतन संवाद अभियान ला सुरुवात करण्यात आली.

यावेळी नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक संदिप कटकुरवार यांनी बालकांच्या मुलभूत अधिकारात बालकांना आनंददायी जीवन जगण्याचा अधिकार महत्त्वाचा असतो.पण जगण्याची बदलती जीवनशैली आणि वाढती व्यसनाधीनता मुलांच्या आनंददायी जगण्यावरच गदा आणत आहे.व्यसनाच्या विरोधात बालकांनी आवाज उठविला पाहिजे असे मत व्यक्त करत विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.तंबाखू व खरा या व्यसनाचे दुष्परिणाम या बाबत मुलांना माहिती देऊन मुलांनी व्यसनापासून दूर राहा निरोगी आयुष्याचा आनंद घ्या असे आवाहन केले.या साठी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ.पाटिल मॅडम, तुषार निखूरे सर, भोगवारसर, नंदवार सर या सर्व शिक्षकांनी सहकार्य करुन हा कार्यक्रम यशस्वी पणे पार पडला.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704