एम सी आर

Category : Uncategorized

Uncategorized

यशवंत ‘ मध्ये इतिहास अभ्या ते ओस मंडळाचे उद्घाटन संपन्न* नांदेड :(दि. ८ ऑक्टोबर २०२६) यशवंत महाविद्यालयातील इतिहास विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने इतिहास अभ्यास मंडळाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते. उद्घाटक व प्रमुख अतिथी राष्ट्रसंत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ, अमरावती अंतर्गत मालेगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. गजानन सोडनार होते. याप्रसंगी इतिहास अभ्यास मंडळाचे तसेच ‘नंदगिरी’ भित्तिपत्रकाच्या फलकाचे विमोचन करण्यात आले. प्रमुख अतिथी डॉ. गजानन सोडनार यांनी, इतिहास हा विषय केवळ पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित न ठेवता क्षेत्रभेटी, ऐतिहासिक स्थळांना भेटी आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या माध्यमातून शिकविल्यास विद्यार्थ्यांमध्ये इतिहास विषयाची गोडी निर्माण होईल, असे प्रतिपादन केले. इतिहासाच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना भूतकाळाचे चिकित्सक आकलन होण्याबरोबरच वर्तमान समजून घेण्याची आणि भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी प्राप्त होते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतिहासाच्या सखोल अभ्यासाची गरज ओळखावी, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी,विद्यार्थ्यांनी इतिहासाच्या अभ्यासासोबतच संशोधनाची आवड जोपासली पाहिजे. संशोधन करताना प्राथमिक स्वरूपाच्या मूळ कागदपत्रांचा, अभिलेखांचा व अन्य ऐतिहासिक साधनांचा शोध घेऊन चिकित्सक पद्धतीने अभ्यास केल्यास संशोधन अधिक दर्जेदार आणि वस्तुनिष्ठ ठरते. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्याची, पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढण्याची आणि इतिहासाकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याची सवय विकसित करावी, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविकात इतिहास विभागप्रमुख डॉ. शिवराज बोकडे यांनी, इतिहास अभ्यास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक, संशोधनात्मक आणि सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास डॉ. संगीता शिंदे (ढेंगळे), डॉ. साईनाथ बिंदगे, प्रा. राजश्री भोपाळे तसेच विद्यार्थी,विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.अजय गव्हाणे, संदीप पाटील, गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Chief Editor
शवंत ‘ मध्ये इतिहास अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न* नांदेड :(दि. ८ ऑक्टोबर २०२६) यशवंत महाविद्यालयातील इतिहास विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने इतिहास अभ्यास मंडळाचे उद्घाटन...
Uncategorized

संग्रहालयीन नमुन्यांपासून वन्यजीव संवर्धनापर्यंतचा अनोखा ज्ञानप्रवास: यशवंत महाविद्यालयात राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त विशेष उपक्रम; (२४० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग)

Chief Editor
नांदेड, दि. ८ ऑक्टोबर २०२६) : राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त यशवंत महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागातर्फे ‘संग्रहालयीन नमुन्यांपासून वन्यजीव संवर्धनापर्यंत : वन्यजीव विविधतेचा शोध’ या विषयावर विशेष उपक्रमाचे...
Uncategorized

यशवंत महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण संपन्न*

Chief Editor
* नांदेड (दि. १० ऑक्टोबर २०२६) यशवंत महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र व उद्यानविद्याशास्त्र विभागातर्फे दि. ९ ऑक्टोबर रोजी वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयातील प्रांगणात विविध प्रकारचे वृक्षारोपण...
Uncategorized

‘यशवंत ‘ मधील कॅडेट्सना वेल्फेअर सोसायटी शिष्यवृत्ती प्राप्त

Chief Editor
नांदेड :(दि. ११ ऑक्टोबर २०२६) यशवंत महाविद्यालयातील एनसीसी विभागातील कॅडेट्स प्रणव चव्हाण व चक्रधर ऐश्वर्या यांची कॅडेट वेल्फेअर सोसायटी शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. त्यांच्या उत्कृष्ट...
Uncategorized

डॉ. राजेश तगडपल्ले यांनी SAMS च्या अध्यक्षपदाची शपथ घेतली; प्रथम SAMSCON 2026 मध्ये महाराष्ट्रातील भूलतज्ज्ञांच्या नव्या पर्वाची सुरुवात

Chief Editor
पाचगणी–महाबळेश्वर : महाराष्ट्रातील भूलतज्ज्ञांच्या व्यावसायिक संघटनात्मक वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून, डॉ. राजेश तगडपल्ले यांनी सोसायटी ऑफ अ‍ॅनेस्थेसिओलॉजिस्ट्स महाराष्ट्र स्टेट (SAMS) च्या अध्यक्षपदाची शपथ पहिल्या...
Uncategorized

जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त नांदेडमध्ये भव्य ‘वॉकथॉन’ व मोफत COLS जनजागृती उपक्रम सोसायटी ऑफ अ‍ॅनेस्थेसिओलॉजिस्ट, नांदेडतर्फे १८ ऑक्टोबर रोजी आयोजन; सर्व नांदेडकरांना सहभागी होण्याचे आवाहन

Chief Editor
नांदेड : जागतिक भूलशास्त्र दिनाचे (World Anaesthesia Day) औचित्य साधून सोसायटी ऑफ अ‍ॅनेस्थेसिओलॉजिस्ट, नांदेड (SAN) यांच्या वतीने रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध सामाजिक,...
Uncategorized

डॉ. राजेश तगडपल्ले यांनी SAMS च्या अध्यक्षपदाची शपथ घेतली; प्रथम SAMSCON 2026 मध्ये महाराष्ट्रातील भूलतज्ज्ञांच्या नव्या पर्वाची सुरुवात

Chief Editor
पाचगणी–महाबळेश्वर : महाराष्ट्रातील भूलतज्ज्ञांच्या व्यावसायिक संघटनात्मक वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून, डॉ. राजेश तगडपल्ले यांनी सोसायटी ऑफ अ‍ॅनेस्थेसिओलॉजिस्ट्स महाराष्ट्र स्टेट (SAMS) च्या अध्यक्षपदाची शपथ पहिल्या...
Uncategorized

यशवंत ‘ मध्ये फॅशन डिझायनिंग करिअर कोर्सचे उद्घाटन संपन्न

Chief Editor
*’ नांदेड:( दि. ७ ऑक्टोबर २०२६) यशवंत महाविद्यालयात फॅशन डिझायनिंग करियर ओरिएंटेड कोर्सचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे...
Uncategorized

महात्मा फुले यांच्या जन्माच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त यशवंत महाविद्यालयात ‘फुले’ चित्रपटाचे खास प्रदर्शन!

Chief Editor
नांदेड : ‘अविद्येच्या दोषांचे दुष्परिणाम दाखवून बहुजन समाजाला विद्येच्या दिशेने घेऊन येणारे कर्ते समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्माचे द्विशताब्दी वर्ष सुरु झाले. यानिमित्ताने यशवंत...
Uncategorized

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात घेतला अखेरचा श्वास; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Chief Editor
मुंबई/गोवा : ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि आपल्या दमदार अभिनयाने हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीवर वेगळी छाप पाडणारे नाना पाटेकर यांचे आज, गुरुवार दि. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी निधन...