गीतसंध्या संगीत मैफिलीने जिंकली रसिकांचे मने

नांदेड : ओ मेरी जोहराजबी, तुझे मालूम नही, मैन पुछा चांदसे तसेच ये रेश्मी जुल्फे, या सारख्या मन्ना डे, महमंद रफी, किशोर कुमार यांच्या लोकप्रिय गीतांची आठवण करून देणाऱ्या डाॅ. देविदास तारू यांच्या गीत संध्या या संगीत मैफलीने रसिकांची मने जिंकली.
जागतिक महिला दिनानिमित्त बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ आणि ड्रीम फिटनेस स्टुडिओ, भाग्यनगर यांच्या वतीने १२ मार्च रोजी गीतसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गायक डाॅ. देविदास तारू, मन तारू यांनी गायलेल्या गाण्यांना रसिकांनी प्रतिसाद दिला. प्रारंभी गझलकार बापू दासरी, वसंत मैय्या, डाॅ. अजय गव्हाणे, माजी महापाैर शैलजा स्वामी, शिक्षण विस्तार अधिकारी किशन फोले, प्रशिक्षक प्रशांत कऱ्हाळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. डाॅ. राम वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना सिनिअर कोच रेणुका गुप्ता यांनी तर डाॅ. भगवान सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.
१९६० ते १०९० च्या दशकातील गाजलेली निवडक गाणे डाॅ. देविदास तारू यांनी गायले. तसेच शैलजा स्वामी यांनी मी तर येते जत्रेला हे गीत सादर केले. रेणुका गुप्ता यांनी उंगुली पकडे के तुने चलना सिखाया… हे गाणे गायले. तर मन तारू यांनी आपल्या सुरेल आवाजाने मैफिलीची रंगत वाढवली. पल पल दिल के पास हे किशोर कुमार यांनी गायलेले गाणे डाॅ. भगवान सूर्यवंशी यांनी सादर केले. या संगीत मैफिलीचे निवेदन पत्रकार भारत दाढेल व शिल्पा भोसले यांनी केले. कार्यक्रमास सुर्वणा वाघमारे, DFS च्या श्रीमती किरणदेवी गुप्ता,डाॅ. विजया दाढेल, रेणुका सोनवणे, शकुंतलाबाई सूर्यवंशी,रेखा भटाणे,अर्चना सूर्यवंशी ,प्रियंका पवार ज्योती पांडगळे,संगीता चव्हाण,विलास ढवळे, श्याम गुप्ता,बालाजी ढगे, रवी लोहाळे,वैशाली लोहाळे,राजेश जाधव, प्रल्हाद घोरबंड ,प्रा.शरद वाघमारे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते