ताज्या घडामोडी

व्यक्तिमत्व विकास मानवी जीवनाचा अविभाज्य घटक… डॉ. कल्पना कदम

नांदेड:
अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या वतीने ‘कौशल्य व व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर आधारित पंधरा दिवशीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. जीवन मसुरे, भाषा प्रयोग शाळा समन्वयक डॉ. इर्शाद खाण, प्रमाणपत्र अभ्यासक्रम समन्वयक डॉ. संदीप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. कल्पना कदम यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित करत असलेल्या विद्यार्थी उपयोगी विविध उपक्रमाचे कौतुक करून, व्यक्तिमत्व विकासामुळे आळस आणि, अनुत्साह आणि निरसतेमध्ये अडकलेली व्यक्ती कार्यक्षम, उत्साही, प्रसन्न आणि आपल्या ध्येयाने प्रेरित व्यक्ती बनते असे सांगून व्यक्तिमत्व विकासाच्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती आपल्या वैशिष्ट्यांना कोणत्याही प्रतिकाराशिवाय आणि आपल्या सीमांच्या बंधनांना त्यागने शिकतो, आनंदी राहणे शिकतो आणि हे सर्व अधिक उत्साहाने आणि चैतन्याने करतो असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. इर्शाद खाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना व्यक्तिमत्व विकास ही काळाची गरज असून अशा पद्धतीच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे मत व्यक्त केले. उद्घाटन समारंभाचा अध्यक्षीय समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. जीवन मसुरे यांनी केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत असताना कौशल्य व व्यक्तिमत्व विकास या विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन करून दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक कामात कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास याची नितांत गरज आहे असे प्रतिपादन केले. पुढे बोलतांना त्यांनी शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक, सामाजिक, आणि सांस्कृतिक विकास करणं हा मानला जातो, हा विकास घडता-घडता मुलांचा आत्मविश्वासही वाढायला हवा, त्यांच्या अंगी प्रगल्भताही निर्माण व्हायला हवी आणि ते संपूर्ण स्वावलंबी व्हायला हवे हा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवूनच या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम समन्वयक प्रा. डॉ. संदीप काळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. संजय कुलकर्णी यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. गीता भोजणे, प्रा. छाया कोंगेवड, मयूर विष्णुपुरीकर, माणिक निलेवाड, संभाजी तोटरे आदींनी परिश्रम घेतले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.