यशवंत ‘ मध्ये महिलांच्या आरोग्यावर व्याख्यान उत्साहात संपन्न
नांदेड:( दि.२ सप्टेंबर २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू व विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महिला सुरक्षा व सुधार समिती, मुलींचे वस्तीगृह तथा राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३१ ऑगस्ट रोजी ‘मुलींचे शारीरिक व मानसिक आरोग्य’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून नांदेड येथील आरोग्य अधिकारी डॉ.पुष्पा यादवराव गायकवाड होत्या.
मार्गदर्शन करताना डॉ.पुष्पा गायकवाड यांनी, कुटुंबाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण घटक आई असते. मुली ह्या अत्यंत चिवट असतात. उत्तम जीवन जगण्यासाठी चांगल्या आरोग्याची आवश्यकता असते. मुलींनी आपल्या सौंदर्यापेक्षा आपल्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्यायला हवे; त्याचबरोबर जेवणामध्ये जास्तीत जास्त पौष्टिक अन्न घ्यावे. पिझ्झा, बर्गर अशा फास्ट फूडपासून मुलींनी लांब राहावे. जेवणामध्ये विरुद्ध आहार घेऊ नये. आयुर्वेदामध्ये जेवणाचे १३ नियम सांगितले आहेत. त्यांनी सर्वात मोलाचा संदेश दिला की, ज्या वयामध्ये जी गोष्ट आवश्यक आहे; तीच गोष्ट करावी. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य देखील जतन करणे, ही आजच्या काळाची गरज आहे. मुलींच्या मासिक पाळीविषयी सुद्धा त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले.
प्रारंभी प्रास्ताविक डॉ.मंगल कदम यांनी केले.
अध्यक्षीय समारोप उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे यांनी यथोचित भाषण करून व्यक्त केला.
सूत्रसंचालन प्रा.वाकोडे यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय डॉ. नीताराणी जयस्वाल यांनी करून दिला तर आभार प्रा.राजश्री भोपाळे यांनी मानले.
कार्यक्रमास डॉ.एल.व्हि.पद्माराणी राव, डॉ. कविता केंद्रे, डॉ.मीरा फड, डॉ. एस.एम. दुर्राणी, डॉ.दीप्ती तोटावार, डॉ.सविता वानखेडे, डॉ.अंजली गोरे, प्रा.भारती सुवर्णकार, प्रा.प्रियंका सिसोदिया, डॉ.रत्नमाला मस्के तसेच विद्यार्थिनिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, चंद्रकांत मोरे, जगदीश उमरीकर, आनंदा शिंदे, पोशट्टी अवधूतवार आदींनी सहकार्य केले.