अतिवृष्टीने झालेल्या नूकसानीचे पंचेनामे करून तात्काळ मदत द्या.:आ.सुरेशरावजी वरपूडकर.
एम सी आर न्यूज नेटवर्क परभणी
परभणी जिल्ह्यातील पाथरी विधान सभा मतदार संघाअंर्गत मागील चौवीस तासात अतिवृष्टी ने गावातील घरे, पिकांचे नुकसान झालेल्या पशु धनाचे तात्काळ पंचनामे करुन प्रशासकीय स्तरावर आपत्ती निवारणाच्या उपाय योजना अंमलात आणुन मदत कार्य साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आज पाथरी विधान सभा मतदार संघाचे राष्ट्रीय काॅग्रेसचे आमदार मा. सुरेशरावजी वरपूडकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
सविस्तर वृत्त असे की, परभणी जिल्ह्यातील पाथरी विधान सभा मतदार संघातील सर्वच तालुक्यामध्ये मागील चौवीस तासात अतिवृष्टी झालेली असून साधारणपणे वनामकृवि. परभणी कृषी हवामानशास्त्र विभाग यांचेकडुन उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ता. पाथरी ढालेगाव २६० मि.मी., ता.मानवत ३०७ मि.मी., सोनपेठ २०१ मि.मी. व परभणी तालुका १५२ मि.मी. पाऊस मागील २४ तासात झालेला असून अतिवृष्टी सदृश पाऊस झाल्यामुळे उंचसखल भागात पाणी साचल्यामुळे बऱ्याच गावात, ओढ्या नाल्या, नदीपात्रात पाणी पातळी वाढल्यामुळे पुरपरीस्थीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे जनजिवन विस्थापित झालेले आहे. गावामध्ये तसेच घरामध्ये पाणी शिरलेले आहे. शेतामध्ये पाणी साचल्यामुळे कापुस, सोयाबिन, मुग, उडीद, हळद व केळी यासारखे पिक धोक्यात आली आहेत. कृषी हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजा नुसार पुढील ७२ तास पाऊस सांगितलेला आहे. तरी सदरील परिस्थीती विचारात घेता, लवकरात लवकर आपत्ती निवारण्याच्या उपाययोजना अंमलात आणाव्यात व मदत कार्य / साहित्य प्रशासकीय स्तरावर उपलब्ध करुन देण्यात यावे व नुकसान गावातील घरांचे, पिकांचे बांधीत झालेल्या पशुधनाचे तात्काळ पंचनामे करून मदत कार्य तात्काळ सूरू करावे अशी मागणी आमदार सुरेशरावजी वरपूडकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. यावेळी मा. रामभाऊजी घांडगे यांच्या सह नागरीक उपस्थित होते.
**
***