ताज्या घडामोडी

मोक्षधामाकडे जाणाऱ्या महामार्गावर पक्षांच्या पिसांचा सडा………..* *शैय्यावर चिरनिर्देत असलेल्या पूण्य आत्म्याच्या नातेवाईकांसह आप्तगणांना मरण यातना

मानवत/ प्रतिनिधी.

मानवत शहरातील आठवडी बाजार परिसरात असलेल्या मानवत नगर परिषदेच्या *मोक्षधाम* स्मशानभूमी कडे जाणाऱ्या शासकिय नियमा प्रमाणे ९ मीटर असलेल्या पण निमुळत्या रस्त्यावर पडलेल्या पक्षांच्या पिसामुळे परिसरात अतिशय उग्रवास पसरला असून त्यामूळे अंत्यं शैय्यावर चिर निर्देत असलेल्या पूण्य आत्म्याच्या नातेवाईकांसह आप्तगनाना पण या रस्त्यावरून पदभ्रमण करतांनी मरणयातना भोगाव्या लागत आहे. परिसरात पक्षांच्या पिसामूळे उग्र असा वास सूटल्यामूळे *मोक्षधामाकडे* मार्गस्त असणाऱ्या आप्तगनांना सुंगधीयूक्त ऊग्र वासाचा *सामना* करण्याची आप्तगणावर पाळी आली असून त्यामूळे अनेकांना या उग्र सू,वासामूळे आजार जडल्याचे बोलले जात आहे तर पक्षांच्या पिसांचा सडा पडला असल्यामूळे आप्तगणांना त्रास होत असल्याने मानवत नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष तथा प्रशासन मा. श्रीमती कोमल सावरे यांनी एक वेळ या *मोक्षधाम* महामार्गाची पाहणी करून स्वच्छता मोहिम राबवावी, व या भागातील *मोक्षधामाच्या* महामार्गाकडे लक्ष द्यावे अशी मागणी आप्तगणातून होत आहे.

याच मार्गावर सुरुवातीला छोटे, मोठे साहित्य विक्रीचे दुकान असल्याने त्यांच्या दुकानदार मोठी वर्दळ असते तसेच या वर्दळीच्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पक्षांची पिसे वायूराजांच्या कृपेणे उडून या रस्त्यावर येत असल्याने ऊग्र दुर्गंधीचा वास पसरत असल्याने नागरिकांसह आप्तगणांना श्रीमूखावर रूमाल धरून या भागातून यावे, जावे लागत असल्यामूळे या उग्रवासाचा श्वासोश्वासावर परिणाम होत असून त्यामूळे आप्तगणांना त्रास सहन करावा लागत आहे. तर पक्षांची पिसे चरण कमळांनी तुडविली जात असून तर काही पवनराज्याच्या जोरामूळे *मोक्षधाम* भूमित उडून जात आहे.
तर याच ठिकाणी परमधामाला मार्गस्त असलेल्या पूण्य आत्म्याला विसावा देण्यासाठी नाते वाईकासह आप्तगणांना या ठिकानी थांबावे लागते त्यामूळे या भागात गर्दी जमा होते. गर्दीमूळे अनेकांना पक्षांच्या पिसाचा सामना करावा लागतो. याकडे मानवत नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे. अशी मागणी मानवत नगरीतील सुज्ञ नागरिकांसह आप्तगणातून जोर धरत आहे. तर मानवत नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी, तथा प्रशासक श्रीमती कोमल सावरे हे तात्काळ लक्ष देऊन या महा मार्गावर *स्वच्छ शहर या मिशन अंर्तगत स्वच्छ मोक्षधाम, महामार्ग* अभियान राबवून आप्तगणांना दिलासा देतील असा ठाम आत्मविश्वास मानवतकरांसह आप्तगण व्यक्त करीत आहे.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.