ताज्या घडामोडी

प्रभाग ९ मध्ये वीस लक्ष रूपये खर्च करून जिजाऊ नगरातील रस्त्ते विकास कामाचा कार्यारंभ.

मानवत / प्रतिनिधी.
मानवत नगर परिषदेच्या परिक्षेत्रातील प्रभाग क्र.9 मधील जिजाऊ नगर येथील सी.सी. सिंमेंट रस्त्याचे उद्घाटन मा. सौ प्रेरणाताई वरपूडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मानवत शहर विकासासाठी पाथरी विधान सभेचे आ.सुरेशरावजी वरपुडकर यांच्या विकास निधीच्या माध्यमातून 20 लक्ष रुपये रस्ते विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असूनत्यामूळे जिजाऊ नगर या परिसरात सी.सी.रस्त्याचे उदघाटन करूण रस्ते विकास कामाचा कार्यारंभ करण्यात आला. या उदघाटन सोहळ्या प्रसंगी मानवत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश भाऊ कोक्कर,राष्ट्रिय काॅग्रेस मानवत शहर कमेटीचे शहराध्यक्ष शामभाऊ चव्हाण, राष्ट्रिय काॅग्रेसचे मानवत तालुक़ा कमेटीचे तालूका अध्यक्ष बाबाजी अवचार, अॅड, विक्रमसिंह दहे, श्रीकांतजी देशमुख, मनमोहन बारहाते, गणेशजी दहे, स्वप्नील जाधव,
युनूस भाई आदीसह राष्ट्रिय काॅग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व या परिसरातील नागरीक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.