ताज्या घडामोडी

वाणिज्य शाखेत विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी- डॉ. डी.एस.यादव

यशवंत महाविद्यालयात वाणिज्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन)

नांदेड प्रतिनिधी: वाणिज्य शाखेत विद्यार्थ्यांना भविष्य घडवितांना अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेकडे एक संधी म्हणून बघितले पाहिजे असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ. डी एस यादव यांनी यशवंत महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन अभ्यास मंडळाचे उद्घाटना प्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे हे होते.प्राचार्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेतील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य विकसित करावे, असा सल्ला दिला. तसेच, त्यांनी संघटनांच्या कार्याची महत्त्वाची माहिती दिली आणि यामधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या संधींचे वर्णन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांनी केले.
यावेळी बोलताना डॉ . डी एस. यादव म्हणाले की, जागतिकीकरणांमध्ये वाणिज्य शाखा ही अतिशय महत्त्वाची असून विद्यार्थ्यांना भविष्यात करिअर करण्यासाठी ही महत्त्वाची शाखा आहे. स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखा निवडल्यास निश्चितच नोकरीचा मार्ग मिळतो असे ते म्हणाले.
यावेळी शारदा भवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. रावसाहेब शेंदारकर यांनी वाणिज्य क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांवर, उद्योजकतेच्या नव्या संधींवर, आणि उद्योग क्षेत्रातील कौशल्यांच्या वाढत्या गरजांवर प्रकाश टाकला.

यावेळी वाणिज्य विभागाचे, डॉ.आर. एल्. सोनटक्के, डॉ. मोहम्मद आमेर, प्रा. भारती सुवर्णकार, प्रा. सोनाली वाकोडे, प्रा. प्रियंका शिसोदिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी किरपाल सिंग
तवाना,अश्विनी नीलेवाड, तर आभार प्रदर्शन अनिकेत बेंद्रे यांनी केले.
कार्यक्रमास वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.