ताज्या घडामोडी

राज्यस्तरीय “लघुनाटिका” स्पर्धेत नेसूबो महाविद्यालयाचे यश.

नांदेड: प्रतिनिधी
अस्तित्व मेकर्स फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय लघुनाटिका स्पर्धा २०२४ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाने सादर केलेल्या बी. ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी विशाल वाटवडे याने लिहीलेल्या व नवलाजी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या “गोष्ट बेकारीची” या “लघुनाटीकेस” सांघिक उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे संपन्न झालेल्या या राज्यस्तरीय “लघुनाटिका” स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, भाईंदर यांच्या सह महाराष्ट्रातील एकूण २९ संघाने सहभाग नोंदवला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाने सादर केलेल्या गोष्ट बेकारीची या लघुनाटीकेस प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला यामध्ये अभिषेक शिंदे, अभिजीत भाड, विशाल वाटवडे यांनी अप्रतिम अभिनय करुण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कलावंतांनी वाढत्या बेरोजगारीवर भाष्य करत, मनोरंजक पद्धतीने बेरोजगारीचा विषय प्रेक्षकांसमोर मांडला. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. बालासाहेब पांडे, सचिवा अँड. वनिताताई जोशी, कोषाध्यक्ष मा.कैलाशचंद काला, प्राचार्य डॉ. सुधिर शिवणीकर, प्रभारी प्राचार्य डॉ. महेंद्र कुमार कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना डॉ. मनीष देशपांडे, डॉ.दत्ता बडुरे, डॉ.आनंद आष्टुरकर, डॉ.संदीप काळे, डॉ. संतोष कोटुरवार, डॉ. पंकज यादव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयात सर्वत्र कौतुक होत आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.