ताज्या घडामोडी

नेट-सेट, पीएच.डी धारक बेरोजगाराची वारी धडकली कुलगुरूच्या दारी.

नांदेड,: प्रतिनिधी
देशभरातील विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, महाविद्यालयांना प्राध्यापक भरती करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) 2019 ते 2022 या कालावधीत पाच वेळा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता सहाव्या वेळेस प्राध्यापक भरती बाबत नव्याने निर्देश देण्यात आले असून, प्राध्यापक भरती प्रक्रियेबाबतची माहिती 31 जुलैपर्यंत पाठवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी यांनी याबाबतचे परिपत्रक दिले. विद्यापीठे, महाविद्यालये, उच्च शिक्षण संस्थांतील प्राध्यापकांच्या जागा रिक्त राहिल्याने त्याचा अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर परिणाम होतो. शिक्षण संस्थांमधील प्राध्यापक टंचाई हा चिंताजनक विषय असल्याचे नमूद करून ‘यूजीसी’ने हस्तक्षेप करून प्राध्यापक भरती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्यापही भरतीप्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्राध्यापक भरती करण्याचे स्मरण यूजीसीने करून दिले आहे. तसेच त्याबाबतची माहिती सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. खालील तारखांना युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन महाराष्ट्र शासनाला प्राध्यापक भरतीसाठी 4 जून 2019, 31 जुलै 2019, 7 ऑगस्ट 2019, 5 सप्टेंबर 2019
22 ऑक्टोबर 2019 व 16 जुलै 2024 या दिवशी परिपत्रक देऊन आठवण करून दिली आहे. पण शासनाने या निर्देशाकडे दुर्लक्ष केलं आहे याचा परिणाम शैक्षणीक गुणवत्तेवर झाला आहे. यामुळेच नेट-सेट, पीएच.डी धारक समितीने देखील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयात देखील नेट-सेट, पीएच.डी धारक समितीच्या भूमिका रास्त असल्याबाबत संकेत दिले जात आहेत. त्यामूळे 100% प्राध्यापक भरती ही शासनाला आता करावीच लागणार आहे. आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुचने नुसार तासिका तत्वावरील धोरण रद्द करून समान काम समान वेतन या मागण्या घेऊन आज दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या दारी असंख्य नेट-सेट, पीएच.डी धारक बेरोजगार टाळ, मृदंगाच्या साह्याने वारीत सहभागी झाले. यावेळी बोलताना *संघर्ष समितीचे राज्य समन्वयक प्रा. डॉ. परमेश्वर पौळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘तासिका तत्वावरील प्राध्यापक’ हा शब्द विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीत व महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात कुठेही दिसत नाही, तासिका तत्व प्राध्यापक प्रणाली ही शोषण करणारी असून ती तत्काळ बंद झाली पाहिजे व यूजीसीच्या निर्देशानुसार 100% प्राध्यापक भरती करून आपत्तीजन्य परिस्थिती किंवा तांत्रिक कारणामुळे 100% प्राध्यापक भरती करणे शक्य नसेल तर नियमानुसार किमान 90% भरती करावी व राहिलेल्या 10% जागेवर कंत्राटी प्राध्यापक भरून त्यांना देखील पूर्ण वेळ प्राध्यापकाप्रमाणे समान कामाला समान वेतन द्यावे* *या कायदेशीर मागणीवर शासन निर्णय काढण्यासाठी समिती आज रस्त्यावर उतरून लढा तर देत आहेच सोबत न्यायालयीन लढा पण देत आहे.’* यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यच्या महाविद्यालयातील समितीचे सदस्य , तासिका तत्वावरील प्राध्यापक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. वारीची सुरुवात विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून करण्यात आली. दरम्यान विद्यापीठाच्या प्रवेशद्वरावर सभेला MFUCTO प्राध्यापक संघटनेचे प्रा. डॉ. सूर्यकांत जोगदंड सर, प्रा. डॉ. डी. एन. मोरे सर व इतर प्राध्यापक मंडळीनी उपस्थितांना मार्गदर्शन करून तासिका तत्वावरील प्राध्यापकावर होणाऱ्या अन्याया विरोधात राज्य सरकारला खडे बोल सुनावले..
या नंतर शिष्टमंडळाने MFUCTO या प्राध्यापक संघटने सोबत कुलगुरूंना रीतसर निवेदन सादर केले यात प्रा. डॉ. प्रकाश हिवराळे, प्रा. डॉ. जीवन चव्हाण, प्रा. डॉ. राजेश्वर कुंटूरकर, प्रा. डॉ. बाबू गिरी,प्रा. डॉ. सुनिल विरकपाळे या राज्य समन्वयकानी निवेदन सादर केले. कुलगुरू महोदयांनी संघटनेच्या मागण्या संबंधी चर्चा केली आणि संघटनेच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जे काही सहकार्य करावे लागेल त्यासाठी शिष्टमंडळाला आश्र्वासित केले.

🙏
नेट-सेट पीएच.डी. धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.