ताज्या घडामोडी

कलकत्ता घटनेच्या निषेधार्थ *मानवतला डॉक्टरांचा लाक्षणिक बंद तहसीलदारांना दिले निवेदन

मानवत / प्रतिनिधी.

पश्चिम बंगालच्या कोलकत्ता येथे निवासी डॉक्टर *डॉ मौमिता देबनाथ* यांच्यावर बलात्कार करून झालेल्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ शनिवारी ता १७ मानवत तालुका डॉक्टर्स संघटनेच्या वतीने सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेऊन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला . तसेच आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली .
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर येथील डॉक्टरांनी एकत्रित येत जोरदार निदर्शने करून तहसील प्रशासनाचे प्रतिनिधी तलाठी श्री नागरगोजे यांना निवेदन देण्यात आले .
यावेळी मानवत डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ अंकुश लाड , कार्याध्यक्ष डॉ सचिन कदम , सचिव डॉ सुशील नाकोड , उपाध्यक्ष डॉ सचिन चिद्रवार , डॉ रामकीशन ईक्कर , कोषाध्यक्ष डॉ विजयकुमार कहेकर , डॉ जितेंद्र वर्मा , डॉ राजकुमार लड्डा , डॉ वरूण सोमाणी , डॉ जुबेर खान , डॉ तुषार कोक्कर , डॉ हर्षद बाकळे , डॉ नामदेव लेंगुळे आदीजण उपस्थित होते .

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.