ताज्या घडामोडी

शारदा महिला मंडळ* यांच्या वतीने नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण संपन्न.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील शारदा महिला मंडळाच्या वतीने येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाषमाध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालया मध्ये दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्रम उस्फूर्तपणे घेण्यात आला. या वेळी विद्यालयातील उपमुख्याध्यापक श्री.उध्दवजी हारकाळ ,श्री.सदाशिवजी होगे,श्री. विश्वनाथजी बुधवंत सर ,सौ पतंगे मॅडम, सौ.कनकुटे मॅडम तसेच सर्व शिक्षक शिक्षिका वृंद यांनी या उपक्रमाचे स्वागत केले या वृक्षारोपणासाठी अनेक वर्षांपासून हजारो रोपे मोफत वाटप करणाऱ्या “शिवराज सेवाभावी संस्थेचे श्री.आप्पाजी चिंचोलकर यांनी उपलब्ध करून दिली त्यांचे हे वृक्ष दान अनमोल आहे या कार्यक्रमात शारदा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.मिनाताई देशमुख ,उपाध्यक्षा सौ.सुवर्णमाला कुलकर्णी, कोषाध्यक्षा सौ.संगीता रुद्रवार ,सौ.शोभा कुलकर्णी,सौ. राणी पारसकर ,डॉ. सौ.शरयूताई खेकाळे यांच्यासह शालेय विद्यार्थ्याच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी पर्यावरण पूरक करंज,वड,बदाम,कडुलिंब अशी एकूण दहा रोपे लोखंडी जाळीसह लावण्यात आले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.