ताज्या घडामोडी

संस्था अध्यक्ष विजयकूमारजी कत्रूवार यांच्या हस्ते के. के. एम.महाविद्यालयात गणवेश वाटप

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील के.के. एम. महाविद्यालया मध्ये दिनांक १५ आगष्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना गणेश वाटप करण्यात आले.
मानवत अर्बन कॉ. बँक लि. मानवत, सांगली अर्बन कॉ. बँक शाखा मानवत, माजी प्राचार्य डॉ.अशोक चिंदूरवार, डॉ.शारदा राऊत, डॉ. सुनिता कुकडे, श्री. सुहास हिबारे व श्री. उदय परभणकर यांच्या योगदानातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
कनिष्ठ महाविद्यालयातील 20 व वरिष्ठ महाविद्यालयातील 11 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी पाथरी तालूका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. विजयकुमार कत्रुवार, संस्थेचे सचिव मा.श्री. बालकिसनजी चांडक, संस्थेचे अन्य पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य,उपप्राचार्य, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शारदा राऊत, यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विनायकराव जाधव यांनी केले.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.