ताज्या घडामोडी

आधुनिक जगात इंग्रजी भाषेशिवाय रोजगार प्राप्ती अशक्य: -डॉ.मिर्झा बेग

नांदेड:( दि११ ऑगस्ट २०२४)
इंग्रजी भाषा ही जागतिक दर्जाची भाषा असून इंग्रजी भाषेतील ज्ञान ग्रहण केल्यानंतर तरुणांना खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी असते. आधुनिक जगात इंग्रजी भाषेच्या ज्ञानाशिवाय रोजगार प्राप्त होऊन स्थिर होणे जवळजवळ अशक्य असल्याचे मत पीपल्स महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील डॉ.मिर्झा बेग यांनी व्यक्त केले.
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित इंग्रजी विभागातील सत्रारंभ सोहळ्यात ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर सोहळ्याचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे, इंग्रजी विभागप्रमुख व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, डॉ. अजय टेंगसे, डॉ. रत्नमाला मस्के, प्रा. माधव दुधाटे आणि डॉ. कैलास इंगोले यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, यशवंत महाविद्यालय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यास सक्षम असून केवळ इंग्रजी भाषेत या शैक्षणिक वर्षापासून तीन नवीन ॲड ऑन कोर्सेस सुरू करण्यात आलेले आहेत. या अभ्यासक्रमाचे कौशल्य प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राबरोबरच इतरही क्षेत्रात रोजगाराची संधी प्राप्त होईल. महाविद्यालयामध्ये विविध व्हॅल्यू ॲडेड, ॲड ऑन आणि सर्टिफिकेट ओरिएंटेड कोर्सेस असून पदवी व पदव्युत्तर ज्ञानाबरोबरच या अभ्यासक्रमाचाही लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा व स्वतःला अपडेट ठेवावे, असे मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी प्रास्ताविक डॉ.एल.व्ही. पदमाराणी राव यांनी केले.
याप्रसंगी इंग्लिश लिटररी असोसिएशनचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या भित्तिपत्रकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमास प्रा.चेतन देशमुख, प्रा.माधव पुयड आणि डॉ.किरण देशमुख यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शेख शार्मीन यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, विठ्ठल सुरनर, परशुराम जाधव आणि डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.