ताज्या घडामोडी

ऑन जॉब ट्रेनिंग: आज काळाची गरज -प्रा.नंदकुमार बोधगिरे

नांदेड:(दि.८ ऑगस्ट २०२४)
सद्यस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रांचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा पाहिला असता कृषी क्षेत्राचा वाटा घटत आहे. उद्योग क्षेत्राचा वाटा स्थिर आहे तर सेवा क्षेत्राचा वाटा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे येणाऱ्या काळात सेवा क्षेत्रात विशेषतः बँकिंग,हॉटेल मॅनेजमेंट आणि ई-कॉमर्स या क्षेत्रामध्ये करिअरच्या जास्त संधी निर्माण होणार आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी त्या क्षेत्रातील कौशल्य येणे आवश्यक आहे भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे. सुशिक्षित बेकारांचे प्रमाण देखील खूप जास्त आहे; परंतु जितक्या जास्त प्रमाणामध्ये कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपल्याला पाहिजे आहेत; तितक्या प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध नाहीत, म्हणून ही कमतरता दूर करण्यासाठी ऑन जॉब ट्रेनिंग या उपक्रमाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलातील अर्थशास्त्र विभागातील प्रा.नंदकुमार बोधगिरे यांनी केले.
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार
‘अर्थशास्त्रातील करिअरच्या संधी’ विषयावर ते बोलत होते.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.पी.आर.मुठे, डॉ.डी.डी.भोसले,डॉ.डी.ए. पुपलवाड, प्रा.राहुल लिंगमपल्ले, डॉ. शिवराज आवाळे , प्रा.नयना देशमुख, प्रा. वाय.एम.पवार, डॉ.प्रवीण सेलुकर ,डॉ. संतोष पाटील तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिराजदार व गजानन पाटील, डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.डी.डी.भोसले यांनी केले तसेच आभार देखील मानले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.