ताज्या घडामोडी

शासकीय नियमाची पायमल्ली करणार्‍यावर तात्काळ कठोर कारवाई करा ;* *@)> दीपक ठेंगे. ( तालूकाध्यक्ष रिपब्लिकन सेना).

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील गट क्र ४८२/२ येथील प्रमाणभुत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या खरेदी विक्रीच्या बनावट परवाणग्या तयार करुन प्लॉट विक्री करणाऱ्यावर योग्य ती “कायदेशीर कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी व संबंधीत खरेदी विक्री खत (फेरफार) रदद करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने तहहिलदार यांच्याकडे दिपक ठेंगे, रवि पंडित यांनी एका निवेदना द्वारे केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मा. जिल्हाधिकारी परभणी यांनी मानवत येथील गट क्र ४८२/२ येथील प्रमाणा पेक्षा कमी क्षेत्रापेक्षा खरेदी विक्री ची परवाणग्या बनावट स्वाक्षरीने केलेल्या प्रकरणी कार्यवाहीसाठी प्रतिक्षा भुते परि. उपजिल्हाधिकरी पाथरी यांनी दिलेला तक्रार अर्ज, मा. जिल्हाधिकारी परभणी यांनी शैलेश लाहोटी उप जिल्हाधिकारी पाथरी यांना गुन्हे दाखल करण्यासाठी दिलेले आदेश पत्र , मा. जिल्हाधिकारी परभणी यांनी शैलेश लाहोटी उप जिल्हाधिकारी पाथरी यांना शेत गट न. ४८२/२ मानवत जमीनीचे मालक *सुनिता राजकुमार लडड्रा* यांनी जमीन अल्पक्षेत्राची एकून ३७ दस्त नोंदणी खरेदी विक्रीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालय परभणी यांची परवाणगी न घेता केली आहे असा गोपनीय अहवाल लाहोटी यांनी दिलेला आहे. मा. जिल्हाधिकारी परभणी यांनी सदर प्रकरणात दोषी विरुध्द गुन्हे दाखल करणे बाबतची कार्यवाही आपणांस अध्यापही केली नाही असे तहसीलदार मानवत आपणांस दिले आहे. दुय्यम निबंधकाने उप जिल्हाधिकारी कार्यालय पाथरी यांच्या जावक क्र. व शिक्के नसतांना याची शहानिशा न करता रजिस्ट्री करुन घेतल्या वरील विषयास व संदर्भास अनुसरुन तक्रार निवेदन देण्यात येते की वरील विषयास व संदर्भास गांभीर्याने घेवून मे. साहेबांनी विक्री करणार्‍यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.