ताज्या घडामोडी

मानवत नगरीत बाबाजानी दुर्राणी यांच्या संवाद दौऱ्याला नागरीकांकडून प्रचंड प्रतिसाद

मानवत / प्रतिनिधी.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीची बिगुल वाजले असून या निवडणूकी मध्ये मा.आ.बाबाजानी दुर्राणी यांनी  पाथरी विधानसभा लढविण्याची जोरदार तयारी चालविली आहे यासाठी आज मानवत नगरीत  संवाद दौऱ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन पेठमोहल्ला येथील सभागृहात करण्यात आले होते. या संवाद दौऱ्याला मानवत शहरातील नागरीकांकडुन या वेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या वेळी प्रथम मा.आ. बाबाजानी दुर्रानी यांचा हजरत टिपु सुलतान चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून सत्कार करण्यात आला कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली.
यावेळी व्यासपिठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट उपजिल्हाध्यक्ष अँड. लुकमान बागवान,  बाबाजानी दुर्राणी, मुजाहिद खान, हन्नान मामा दुर्राणी, युवा नेते जुनेद खान ,तारेख दुर्राणी, हाजी अब्दुल अजीज बागवान, आजम कुरेशी,  अब्दुल करीम कुरेशी,  मजीद बागवान यांची उपस्थिती होती. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावित राष्ट्रवादी काॅग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अँड. लुकमान बागवान यांनी केले.
या प्रसंगी नियामत खान मित्र मंडळ यांच्या वतीने बाबाजानी दुर्राणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी
मा.आ. बाबाजानी दुर्राणी यांनी आपल्या मतदारसंघातील गोरगरीब लोकांच्या अडीअडचणी सोडविले गावागावात मूलभूत सुविधा सोबतच समाज मंदिरांसाठी निधी उपलब्ध करून दिला निधी देताना कधी जात धर्म पक्ष असा भेदभाव केला नाही यामुळेच बाबाजानी दुर्राणी यांची ओळख धर्मनिरपेक्ष राजकारणी म्हणून सर्वत्र आहे व पुढेही विकासाचा मॉडेल घेऊनच बाबाजानी दुर्राणी हे निवडणूक लढविणार आहे. येणार्‍या निवडणूकी मध्ये सर्वांनी दुर्राणी यांना विजयी करावे असे प्रतिपादन मुजाहिद खान यांनी यावेळी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
मला मा. शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटच्या वतीने उमेदवारी मिळण्याची  शक्यता आहे. त्यामुळे आम्ही तय्यारी सुरु केली आहे. यास जनतेचे खुप समर्थन मिळत आहे मला विधानसभेत जाण्याची संधी मिळाली तर मानवत शहरासह पाथरी विधानसभा मतदार संघ विकासाच्या माध्यमातून चेहरा मोहरा बदलुन टाकु असे प्रतिपादन बाबाजानी दुर्राणी यांनी यावेळी केले.
या संवाद दौरा कार्यक्रमात  मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नियामत खान मित्र मंडळाच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख जुबेर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे मानवत शहराध्यक्ष सुरेश (बाबाजी) कच्छवे यांनी मानले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.