ताज्या घडामोडी

युवकांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात अभिरूप संसदेचे जिल्हास्तरीय अधिवेशन

नांदेड प्रतिनिधी:युवकांनी देशाच्या लोकशाही कार्यपद्धती आणि मतदान जागृती वाढवून भारतीय लोकशाही अधिक भक्कम करण्यासाठी युवकांनी सजग राहिले पाहिजे. देशाच्या लोकशाहीत युवकांची भूमिका महत्वाची असून सद्यस्थितीतील निवडणुकीचा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभाग आयोजित (अभिरूप संसद) जिल्हा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी युवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आजचा युवक समाज माध्यमांमध्ये अधिक प्रमाणात गुंतत आहे. युवकांनी लोकतंत्र समजून घेण्यासाठी सजग राहिले पाहिजे. युवक म्हणजे लोकशाही कार्यपद्धती समजावून सांगणारे दूतच आहेत अशी प्रतिपादन माननीय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.बालासाहेब पांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड दक्षिणचे आ.मोहन अण्णा हंबर्डे, संस्थेचे कोषाध्यक्ष कैलासचंद काला, प्रभारी प्राचार्य डॉ.एम.वाय.कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.कल्पना कदम
कार्यक्रमाचे समन्वयक, प्रा. अनंत कौसडीकर, सहसमन्वक, डॉ.सुग्रीव फड, यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी विद्यार्थ्यांना विधिमंडळाच्या अधिवेशनाची कार्यपद्धती समजावून सांगितली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.कल्पना कदम यांनी केले तर अध्यक्षीय समारोपात मा.बालासाहेब पांडे म्हणाले की,महाविद्यालयीन स्तरावर विधिमंडळ अधिवेशनाची कार्यपद्धतीची विद्यार्थ्याना माहीती करून देण्याचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.
अभिरूप संसद या जिल्हास्तरीय कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप काळे तर आभार प्रदर्शन डॉ. विजय तरोडे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.