कु. आकांक्षा अडपोड व कोंडलाडे शुभांगी पहिल्या प्रयत्नामध्येच सेट परीक्षा उत्तीर्ण. पदवी आणि पदवीधर अर्थशास्त्र विभाग आणि संशोधन केंद्र यशवंत महाविद्यालय यांचे घवघवीत यश

नांदेड: सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या वतीने एप्रिल 2024 मध्ये घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत पदवी आणि पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग आणि संशोधन केंद्र यशवंत महाविद्यालय नांदेड येथील 2023-24 या नुकत्याच बाहेर पडलेल्या बॅचची व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र विषयात सुवर्णपदक प्राप्त गुणवंत विद्यार्थिनी कु. आकांक्षा अडपोड व कोंडवाडे या दोन्ही विद्यार्थीनी पहिल्याच प्रयत्नामध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार तथा संस्थेचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण आणि महाविद्यालयाचे प्राचार्य तथा स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु डॉ. जी. एन. शिंदे यांच्या सोबत अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर पी. आर. मुठ्ठे तसेच डॉक्टर ज्ञानेश्वर पुपलवाड डॉक्टर दिगंबर भोसले, विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक आणि अन्य महाविद्यालयीन कर्मचारी यावेळी उपस्थित होते.