ताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दीना निमित्त सीड बॉल चा उपक्रम राबवण्यात आला

नांदेड:
सारथी संस्थे मार्फत राबवण्यात आलेल्या ‘शिवराज्याभिषेक ३५०० या अभियाना अंतर्गत सारथी संस्थेद्वारे पी.एच.डी. च्या संशोधक विद्यार्थ्यांना सीड बॉल तयार करून महाराष्ट्रातील विविध किल्यांवर ते रुजवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. त्या अनुषंगाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुल येथील संशोधक विद्यार्थ्यांकडून हा उपक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यात आला असून नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे असलेल्या रामगड किल्ल्या वर सीड बॉल तयार करून टाकण्यात आले. पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबवण्यात आला असून त्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नांदेड येथील संशोधक विद्यार्थी सूर्यकांत दादाराव सोमवंशी, नागेश शिवाजीराव काळे, श्रीकांत हनुमान कालिंदर व भीमराव सूर्यवंशी या विद्यार्थ्यांद्वारे माहूर येथील रामगड किल्ल्यावर हा उपक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत स्थानिक झाडांच्या बिया गोळा करून त्यांना मातीच्या व कोकोपीट च्या मिश्रणामध्ये लाडूच्या आकाराचे बॉल तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. अश्या मिश्रणामध्ये झाडांच्या बिया सुरक्षित राहतील व पावसाच्या मदतीने त्यांना तेथे रुजण्यास मदत होईल. यासंबंधी स्थानिक झाडे जसे कि गुलमोहर, शिरस, चिंच, बाभूळ, कडुलिंब, सीताफळ, शेवगा इत्यादी झाडांच्या जवळपास ३०० बिया गोळा करून त्या टाकण्यात आल्या. विशेषतः सीड बॉल टाकल्यानंतर पावसाची हजेरीही महत्वाची ठरली असून ते सीड बॉल चे झाडात रूपांतर होण्यास त्यांना मदत होईल. ह्या उपक्रमामध्ये सामाजिक शास्त्रे संकुल येथील संचालक डॉ. घनश्याम येळणे यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.